दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी जालना-ज्ञानेश्वर साळुंके
. जालना जिल्ह्यांचे नूतन विद्यमान जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी आज दुपारी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्याकडूंन पदभार स्वीकारला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षकांनी त्यांचे स्वागत करीत पदभार सोपवला. जालना जिल्ह्यांचे मावळते जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे यांची नागपूर लोहमार्गांच्या पोलीस अधीक्षक पदी बदली करण्यात आली असून. त्यांच्या रिक्त जागेवर पुणे येथील दहशतवाद विरोधी पथकांचे पोलीस अधीक्षक म्हणून तुषार दोशी यांची आता नव्यांने जालना पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांनी मंगळवारी दुपारी पोलीस मुख्यालयांत हजर राहून अप्पर पोलीस अधीक्षकांकडूंन पदभार घेतला. यावेळी नूतन पोलीस अधीक्षकांचे स्वागत जालना जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोशींनी आपल्या कामकाजांस प्रारंभ केला. नूतन पोलीस अधीक्षकांनी आपल्या पोलीस सेवेमध्य.