दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
जिद्द, मेहनत व कठोर परिश्रमा च्या जोरावर सर्वांच्या सहकार्याने लोहा तालुक्यातील मौजे खडकमांजरी येथील गरीब कुटुंबातील विद्यार्थी अर्जुन रामकिशन नरवाडे या विद्यार्थ्यांनी एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण करुन डॉक्टर बनण्याचे स्वप्न केले साकार .
लोहा तालुक्यातील मौ.खडकमांजरी या छोट्याशा खेड्यातील मुलगा अर्जुन रामकिशन नरवाडे या मुलाने M.B.B.S ही पदवी प्राप्त केली. अर्जुनचे शिक्षण हे गावातील 1 ते 5 वी पर्यंत जि.प.प्रा.प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण झाले.येथे प्रकाश वामनराव नागरगोजे सरांमुळे त्यांचा पाया पक्का झाला. पुढचे शिक्षण गावामध्ये नसल्यामुळे जवळच्या 5 कि.मी. अंतरावर असलेल्या श्री संत मोतीराम महाराज माध्यमिक विद्यालय कारेगाव येथे पायाने जाणे -येणे करीत ६ वी आणि ७ वी पर्यंत शिक्षण घेतले. पुढे तिथे सेमी इंग्रजी माध्यम नसल्यामुळे त्याने पुढचे शिक्षण (१० वी पर्यंत) शिक्षण हे कै. विश्वनाथराव नळगे माध्यमिक विद्यालय लोहा येथून घेतले. येथील सर्व शिक्षकांनी जिथे त्याला अभ्यासात समजत नसेल ते सोप्या पद्धतीने समजाऊन सांगितले विशेषतः नळगे शाळेतील चव्हाण सरांचे खूप मोलाचे मार्गदर्शन लाभले.नंतर पुढचे शिक्षण कुठे घ्यायचे हा प्रश्न मनात येत होता आणि लहानपणापासून डॉक्टर होण्याचे स्वप्न मनात होते.त्यामुळे त्याने विचार केला की ११ वीला बायो ग्रुप निवडायचा . त्यासाठी खडकमांजरी येथील भुमिपुत्र असलेले प्रा . गणेश चौगुले सर यांच्या कोचिंग क्लासेस नादेड येथे ऑडमिशन घेतले,पण त्यांची आर्थिक परिस्तीती ही नाजूक होती . त्यात चांगली गोष्ट म्हणजे आमच्या गावचे तसेच डॉ. अर्जुन च्या वडिलाचे मामा असलेले आदरणीय प्रा.गणेश चौगुले सरांचे ट्युशन नांदेड होते(ते आता IIB मध्ये रुपांतर झाले आहे. तेव्हा त्यांच्याकडे गेल्यास त्यांनी त्यांच्या स्वतःच्या ट्युशन ला फीस माफ केली, व तसेच बाकीचे ट्युशनची पण फिस न भरता क्लासेस ला बसवले डॉ.अर्जुनला सुरुवातील तेथे वातावरणात मिसळायला खूप कठीण होते.त्याच्यासोबत खुप हुषार मुले होते काहीचे तर पहिलीपासून इंग्रजी मध्येच शिक्षण झाले होते .आणि अर्जुनचे इंग्रजी खूप कच्चे होते. त्यामुळं सुरुवातीला वाटल की आपल्याला काय होणार आस त्याला वाटत होत . पण मनात जिद्द होती की त्याला काहीही करून डॉक्टर व्हायचे आहे . नंतर ते प्रा.गणेश चौगुले सरांची भेट घेतली व आर्थिक परिस्थिती बदल सर्व काही संगीतले त्यावर सर म्हंटले की तू मेहनत कर तुझ्या कष्टाला 100% फळ मिळेल , चौगुले सरांनी सतत मार्गदर्शन करत असत.तसेच तेथील सर्व शिक्षक विशेषतः भोसले सर,कुशवाह सर,देशमुख सर,राऊत मॅडम यांनी अभ्यासातील प्रत्येक शंका दूर करत गेले. कुठे ते खचून न जाता पुढे पुढे यश येत होते, चौगुले सरांना भेटल की त्याला बळ येतं होते,त्यांनी पहिल्यांदा MH-CET परीक्षा दीली त्यातून ३ गुणाने त्याचा नंबर गेला. नंतर दुसऱ्या प्रयंतानाचा वेळी NEET ही परीक्षा लागू झाली.त्यात त्याला चांगल्याप्रकारे यश प्राप्त झाले आणि त्यांचा नंबर MIMSR MEDICAL COLLEGE, LATUR येथे लागला. येथे लागल्यास प्रा.चौगुले सरांनी आर्थिक मदत ही स्कॉलरशिप च्य्या रुपात दिली. तेथे ते प्रत्येक वर्षी च्या परीक्षेत चांगले गुण घेऊन पास झाले.आणि तसेच त्याचे काका म्हणजेच IIB NANDED चे संचालक दशरथ पाटील (लाडंगे) सर यांनी सुध्दा त्याला खूप मदत केली व त्याच्या यशामध्ये सिंहाचा वाटा असलेले त्यांचे – आजी सुशाबाई विठ्ठलराव लोकडोबा नरवाडे आजी-आजोबा आई-वडील,- सौ-लक्ष्मीबाई रामकिशन नरवाडे,केशव नरवाडे,मधुकर नरवाडे , (काका) काका-काकु, आणि मामा … यांच्यामुळे हे शक्य झाले .. कधीही न शक्य होणार स्वप्न साकार झाले ,
आणि दि-28 मे रोजी त्यांच्या लातुर येथे काॅलेज मधील M.B.B.S. ची पदवी सर्टिफिकेट -डॉ.चंद्रकांत शिरोळे सर (Academic Director of MIMSR MEDICAL COLLEGE, LATUR) यांच्या हस्ते पदवी सर्टिफिकेट देण्यात आले आले,छोटाशा गावात अर्जुनने एम,बी,बी,एस ,डाॅक्टर होण्याचा मान मिळवून
विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला.
अर्जुन नरवाडे हा एमबीबीएस डॉक्टर झाल्याने गावात गावकरी मंडळीनी अतिशय आनंदाने हा दिवस गावात साजरा करुन अर्जुन नरवाडे यांचा सत्कार केला
तसेच ,शिवा संघटनेचे लोहा तालुका विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष-राजकुमार पिल्लोळे खडकमांजरीकर , यांच्या वतीने ही सत्कार करण्यात आला.
तसेच अर्जुन नरवाडे हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांने अभ्यासाच्या जोरावर एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण करून डॉक्टर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन सर्व स्तरातून होत आहे.