दैनिक चालु वार्ता लातूर जिल्हा प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर:- एकीकडे आरोग्य क्षेत्रामध्ये लातूर जिल्ह्याचा झेंडा दिल्लीच्या तख्तामध्ये झळकत असतांना प्राथमिक आरोग्य केंद्र अंधोरी ता. अहमदपूर जि. लातूर मात्र त्याला अपवाद तर नाही ना.? जनतेच्या आरोग्याचे मंदिर म्हणावे की मदिरालय असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते दिल्ली मध्ये लातूर जिल्हाला आरोग्य विभाग मध्ये प्रथम पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आले.पण प्राथमिक आरोग्य केंद्र अंधोरी ता.अहमदपूर जि. लातूर येथे मात्र सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळ चालविला जात आहे .आतापर्यंत आपण औषधी बाटल्या ठेवण्यासाठी आलमारीचा वापर करताना पाहिलं आहे पण आता जनतेच्या डोळ्यासमोर प्राथमिक आरोग्य केंद्र अंधोरी येथे वैद्यकीय अधिकारी ह्यांच्या निवास्थानी दारूच्या बाटल्या दिसून येत आहेत. ज्यांना आपण देवमाणूस मानतो तिच माणस जर मद्यधुंद होवुन् खरंच रुग्णाच्या आरोग्याशी खेळत आहेत का ? प्राथमिक आरोग्य केंद्र अंधोरी नेमकं दारूचा अड्डा आहे का आरोग्य केंद्र आहे हे प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळा कारभार दिसून येत आहे . प्रशासन दुर्लक्ष का करत आहे? प्रशासन याची दखल घेऊन कार्यवाही करेल का हा प्रश्न समोर येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र अंधोरी येथे भोंगळा कारभार दिसून येत. आहे.आरोग्यच्या तक्रारी असणाऱ्यासाठी मंदिर असलेलं हे आरोग्य केंद्र मदिरालय होत असेल तर खूपच वाईट गोष्ट आहे.तसे तर अंधोरी प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण भागाशी जवळीक असणार आपल हक्काच केंद्र आहे पण याच केंद्रात अस होत असेल तर सामान्य नागरिकांनी करायच काय .अंधोरी केंद्राशी निगडित अनेक खेडे आहेत जस की धसवाडी,ढाळेगाव, सुमठाणा ,येलदरी,गुट्टेवाडी,कवलदरा,वंजारवाडी, उजना, गंगाहीप्परगा,रुद्धा असे अनेक सर्व गावे अंधोरी प्राथमिक आरोग्य केंद्रास निगडित आहेत .सर्वांच्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया अशाच वातावरणात होत असतील तर कित्ती अवघड आहे.वेळीच प्रशासनानं कार्यवाही नाही केली तर हाच मदिरालायचा खेळ पूर्ण राज्य भर चालेल.यांच्यावर योग्य ती कार्यवाही करा अन्यथा आंदोलन करू अशी विविध संघटना,आणी पक्षाच्या नेत्यानी दै.चालु वार्ताशी सम्भाषण करताना आपल मत व्यक्त केल आहे.