दैनिक चालु वार्ता अहमदपुर प्रतिनिधी -विष्णु मोहन पोले
==================
लातुर/अहमदपुर: शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे सर्व अहिल्याभक्ताच्या वतीने 31मे अहिल्यादेवी जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले .प्रथमत: अहिल्या मातेच्या प्रतिमेचे पूजन करून सर्वच अहिल्या भक्तांनी अहिल्या मातेचे दर्शन घेत विनम्र अभिवादन केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो! येळकोट येळकोट जयमल्हार अशा घोषणा देत त्यांना शब्दिक मानवंदना दिली त्या प्रसंगी उपस्तिथ राम नरवटे पाटील, शिवाजीराव खांडेकर,प्रा.गोपाळ माने सर,देवकत्ते सर,नाईक सर,नाना नरवटे पाटील, आनंद देवकत्ते,बालाजी देवकते, बालाजी पारेकर,लखन घोडके,पत्रकार विष्णु पोले, परशुराम सुरनर आणी इतर सर्व अहिल्याभक्त उपस्तिथ होते.