दैनिक चालु वार्ता अंबाजोगाई प्रतिनिधी -किशोर फड
बीड/अंबाजोगाई
अंबाजोगाई येथील चार तरुण रायगड किल्ल्यावर होणाऱ्या आगामी शिवराज्य अभिषेक सोहळ्यास सायकलवर आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून रवाना झाले. शरद सूर्यवंशी, संतोष कदम, अतुल वखरे व बाळासाहेब लाखे अशी या तरुणांची नावे आहेत.
आज ते अंबाजोगाई येथून पू. अहिल्यादेवी होळकर चौक येथून पू. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास वंदन करून रायगडला रवाना झाले. ५५० किमीचे अंतर ५ दिवसात पूर्ण करून ते रायगडला पोहचतील. शिवराज्य अभिषेक सोहळ्यात सहभागी होवून ते परत येतील. केज, कुर्डुवाडी, पाटस, ढमालेवाडी व पाचाडला पोहचून ५ जूनला रायगडावर जातील.
यावेळी या सायकलस्वार यांना सर्व श्री दगडू लोमटे, अँड. जयसिंग चव्हाण, मनोज लोढा, विलास यादव, अण्णा रोहम , सदानंद वालेकर आदींनी शुभेच्छा देवून रवाना केले.