दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी- लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- संपूर्ण राज्यात शासन आपल्या दारी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. हे अभियानात नांदेड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागांतर्गत अनेक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वर्षा ठाकूर – घुगे यांनी दिली आहे.
या अभियानात दिव्यांग कल्याण व पुनर्वसन योजना जिल्हा परिषद ५ टक्के सेस निधीतून ६१६ लाभार्थी, जिल्हा परिषद उपक्रर २० टक्के मागासवर्गीय निधी सन २०२२ – २३ अंतर्गत ४३ मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी प्रोत्साहनपर अनुदान, जिल्हा परिषद उपकर २० टक्के मागासवर्गीय निधी सन २०२२-२३ अंतर्गत ६५ लाभार्थ्यांना गाय / म्हैस खरेदीसाठी अनुदान तसेच महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नांदेड यांच्या माध्यमातून १० अंध लाभार्थ्यांना स्मार्ट केन, गरजू १० दिव्यांग लाभार्थ्यांना व्हील चेअर तसेच १० दिव्यांग लाभार्थ्यांना तीन चाकी सायकलचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप केले जाणार आहे असे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी श्री सत्येंद्र आऊलवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.