दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी -शिवकुमार बिरादार
मुखेड दि 31 मे
उपजिल्हा रुग्णालय येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून यावेळी रुग्णालयातील डॉ. नर्स स्टाफ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.
एका कुशल महान राज्यकर्ती, प्रजेच हित वेळोवेळी जपणारी व विरांगणा सर्व गुणाने निपुण, आदर्श राज्यकारभार एक स्री कसा चालवू शकते याचं एक मुर्तीमंत उदाहरण सर्व जगाला दाखवून दिले अशा चिरस्मरणात राहणाऱ्या लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष, राजमाता, पुण्यश्लोक.. महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती मोठ्या उत्साहात उप जिल्हा रुग्णालय मुखेड येथे वैद्यकीय अधिक्षक डॉ किशोर कदम यांच्या अध्यक्षतेखाली व नेत्रतज्ज्ञ डॉ सुधाकर तहाडे, डॉ संतोष टाकसाळे, डॉ शोभा देवकाते, डॉ उमाकांत गायकवाड, डॉ गोपाळ शिंदे, डॉ प्रसाद नूनेवार, कार्यालयीन अधीक्षक श्री चप्पलवार, अधीसेविका श्रीमती मालती वाघमारे, श्री डाके, श्री पुंडाजि सगर यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. यावेळी रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .