दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड – गोविंद पवार
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विभागीय केंद्र नांदेड अंतर्गत येणाऱ्या श्री संत गाडगे महाराज महाविद्यालय लोहा येथील पदवी प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे अभ्यास केंद्राचे प्रवेश शुल्क स्विकारुनही केंद्रसंयोजक प्रा.डाॅ.अरुण भंडारे यांनी प्रवेश निश्चित केले नाहीत. प्रा.डाॅ.अरुण भंडारे हे मागील अनेक वर्षांपासुन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाअंतर्गत येणार्या महाविद्यालयाच्या अभ्यासकेंद्राचे संयाेजक म्हणुन काम करत हाेते. अभ्यासकेंद्राच्या सर्व विद्यार्थांच्या प्रवेशप्रक्रियेची त्यांची जबाबदारी असताना त्यांनी जवळपास 190 पेक्षाही ज्यास्त विद्यार्थांचे प्रवेश निश्चत केले नाहीत. परिणामी अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल अशा स्वरूपाची चर्चा लाेहा शहरात पसरली होती. अशा स्थितित नुकसान झालेल्या विद्यार्थांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.अशाेकराव गवते यांच्याकडे लेखी तक्रार दिली. त्या अनुषंगाने महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.अशाेकराव गवते यांनी सदरील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने स्वत: पाेलीस स्टेशन लाेहा येथे जाऊन मा.पाेलीस निरिक्षक लाेहा यांच्याकडे संबंधित दाेषींवर याेग्य ती कारवाई करण्यासाठी लेखी तक्रार दिली त्या तक्रारिच्या आधारे पाेलीसात त्यांच्या विराेधात गुन्हा दाखल झाला. याशिवाय विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान हाेणार नाही यासाठी उपस्थित विद्यार्थि व पालकांना लेखी हमी दिली आणि पुढील प्रयत्न सुरु केले. यामध्ये प्राचार्य डॉ.अशोकराव गवते यांनी प्रसंगावधान राखून विद्यापीठाच्या नांदेड विभागीय केंद्रातील मान्यवर अधिकार्यांसाेबत तातडीची बैठक बोलावून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न केले .त्यांच्या प्रयत्नाला लवकरच यश मिळाले. दिनांक 30.5.2023 रोजी डॉ.मोहन बी के, वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार. डॉ. चंद्रकांत पवार उपकुलसचिव यांनी महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट दिली व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोकराव गवते तसेच सर्व विद्यार्थ्यांसोबत बैठक घेऊन संवाद साधला. यावेळी प्राचार्य डाॅ.गवते यांनी झालेला प्रकार सविस्तरपणे विशद केला. लागलिच सदरील समीति सदस्यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती विद्यापीठात सादर केली. आणि विद्यापीठाच्या मा. कुलगुरू प्रा.डाॅ.संजीव सोनवणे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करता प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश दिनांक 06.06.2023 पर्यंत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून निश्चित करण्यात यावेत. तसेच त्या विद्यार्थ्यांना माहे नोव्हेंबर/डिसेंबर 2023 मध्ये होणाऱ्या पुरवणी परिक्षेला बसता येईल. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असा विद्यार्थांच्या शैक्षणिक हिताचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे प्राचार्य डाॅ.अशाेकराव गवते यांनी केलेल्या प्रयत्नाला यश मिळाले आणि विद्यार्थि व पालकांचा संभ्रम दूर होऊन त्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याबद्दल विद्यार्थी व पालक यांनी या निर्णयाचे व प्राचार्य डाॅ अशाेकराव गवते यांच्या प्रयत्नांचे स्वागत केले आहे. या प्रकरणामध्ये संस्थेचे अध्यक्ष प्रा.डाॅ.पुरुषाेत्तमराव धोंडगे, सचिव मा. गुरुनाथराव कुरुडे, सहसचिव अॅड. मुक्तेश्वरराव धोंडगे, महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री व्ही.जी.चव्हाण यांनी प्राचार्य डाॅ.अशाेकराव गवते यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांना विद्यार्थि हिताचा निर्णय घेण्यासाठी पाठींबा दिला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.अशाेकराव गवते यांनी मुक्त विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा.डाॅ.संजीव सोनवणे, नांदेड केंद्राचे सर्व पदाधिकारी, संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करनार्या सर्वांचे आभार मानले.