दैनिक चालु वार्ता प्रतिनिधि मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा..तालुक्यातील सोनुनकरवाडी येथील जनार्धन कालापाड (गव्हाणे ) हे किडणीच्या आजाराने त्रस्त्र होते त्यांना सदरील किडणी प्रत्यारोपन करिता येणारा खर्च हा कालापाड परिवारास न परवडणारा असल्याचे समजल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांनी वैद्यकीय मदत सेवा पक्षाचे तालुका प्रमुख दत्ता अंभोरे यांना संबधिची सर्व माहिती कळवली .व मुख्यमंत्री सहायता निधीतुन मदत करावी अशी विनंती केली.उदयसिंह बोराडे यांनी कालपाड परिवाराकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी लागणारी सर्व कागदपञासह प्रस्ताव मुख्यमंत्री सहायता निधीकडे दाखल केला.व त्यांच्या पाठपुराव्यामुळे कालपाड यांना मुख्यमंत्री सहायता निधीतुन दोन लाख रूपयाची अर्थिक मदत मंजूर करण्यात आली. दिनांक १९/५/२०२३ रोजी कालापाड यांच्यावर किडनी प्रत्यारोपन करण्यात आले.
श्री कालापाड यांनी शिवसेना तालुका प्रमुख या नात्याने माझ्याकडे शासनाकडून काही आर्थीक मदत मिळेला अशी चर्चा केली असता त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन जास्तीत जास्त आर्थीक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आणि त्यांच्याकडील उपलब्ध कागदपत्र, दवाखान्याचे इस्टीमेटसह सर्व प्रस्ताव मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष यांच्याकडे दाखल केला आणि सदरील बाबीचा पाठपुरावा करुन कालापाड परिवारास २ लक्ष रुपयाची आर्थीक मदत मिळून देण्यात आली .कालपाड परीवाराने मानले उदयसिंह बोराडे यांचे आभार.
याच प्रमाणे तालुक्यातील काही गरजु रुग्णांनी आजारास खचुन न जाता शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे अवाहन शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे यांनी केले आहे.