दैनिक चलु वार्ता चाकुर तालुका प्रतिनिधी – नवनाथ डिगोळे
लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंती निमित्त राचन्नावाडी येथे ता.३१ में रोजी अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पुजण करून संयोजन समितीच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समितीच्या वतीने संध्याकाळी सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.राजेश तगडपल्लेवार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सहशिक्षक बालाजी नंदगावे यांनी केले.त्यानंतर पोलीस भरतीमध्ये नुकतीच निवड झालेल्या पद्मिण यरनाळे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.तसेच हजारो भाविकांना अल्प दरात विविध देवदेवतांचे दर्शन घडवून आणत असलेल्या शिवराज शेळके व नरसिंग वागलगावे यांचा सत्कार करण्यात आला.
प्रसिध्द व्याख्याते प्रा.राजेश तगडपल्लेवार यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जिवन कार्यावर समाजबांधवांना सखोल असे मार्गदर्शन केले.पुढच्या वर्षी २०२४ मध्ये राचन्नावाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनी गावात वाचनालयाची सुरवात करुन लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांची जयंती साजरी करावी असे अहवान प्रमुख व्याख्याते प्रा.राजेश तगडपल्लेवार यांनी आपल्या व्याख्यानातून तरूणांना ज्ञानरूपी संदेश दिला.पुढे बोलताना प्रा.तगडपल्लेवार म्हणाले की,अहिल्यादेवी होळकर या कुशल प्रशासक होत्या.त्यांनी राजकारणाला महत्त्व न देता समाज कार्याला जास्त महत्त्व देऊन जनतेच्या हितासाठीचे अनेक मौल्यवान निर्णय घेतले त्यामुळे अहिल्यादेवी या पुण्यश्लोक झाल्या अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर मोलाचे मार्गदर्शन प्रा.राजेश तगडपल्लेवार यांनी केले.त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त मा.उपसभापती सज्जनकुमार लोणाळे यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनचरित्रावर जनतेला मार्गदर्शन केले.आपण जयंती दिनी डिजीवर नाचण्यापेक्षा अहिल्यादेवीचे चरीत्र वाचुन त्यांच्या सारखे वागण्याचा प्रयत्न करा असा मोलाचा संदेश मा.पंचायत समिती उपसभापती सज्जनकुमार लोणाळे यांनी दिला.
या कार्यक्रमासाठी मा.उपसभापती वसंतराव डिगोळे,मा.पंचायत समिती उपसभापती सज्जनकुमार लोणाळे,भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाचे प्रा.राजेश तगडपल्लेवार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती प्रशांत पाटील,शिक्षक रंजीत घुमे,पोलीस पाटील गुणवंत पाटील,सोसायटीचे चेअरमन शिवाजी वागलगावे,सरपंच सारिखा नंदगावे,अरूण वागलगावे,उपसरपंच संतोष चिंचोळे,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समितीचे अध्यक्ष अतुल चिंचोळे,ग्राम पंचायत सदस्य मारोती पाटील,ग्राम पंचायत सदस्य मिराबाई वागलगावे,मा.सरपंच सहदेव वागलगावे,रावसाहेब वागलगावे,,शिमुर्ती वागलगावे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजकुमार वागलगावे यांनी केले तर आभार गणपत वागलगावे यांनी मानले या कार्यक्रमास गावातील महिला पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते