दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड- गोविंद पवार
सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात हरिभाऊ यशवंतराव चव्हाण यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असून सेवानिवृत्ती नंतर त्यांनी सांस्कृतिक क्षेत्रात पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन जिल्ह्याचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले
लोह्याच्या व्यंकटेश गार्डन येथे प्राथमिक पदवीधर शिक्षक हरिभाऊ यशवंतराव चव्हाण यांचा
सेवापूर्ती सत्कार सोहळा जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी व्यासपीठावर आ.मोहनअण्णा हंबर्डे, माजी आ रोहिदास चव्हाण , राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, संस्थेचे अध्यक्ष वसंतराव पवार, ऍड मुक्तेश्वर धोंडगे, जिल्हा बँकेचे संचालक प्रवीण पाटील चिखलीकर, नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी , भाजपाचे एकनाथ पवार, माणिकराव मुकदम, भाजपाचे ज्येष्ठ केरबाजी बिडवई , माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम , उपनगराध्यक्ष दता वाले ,माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, शिवाजीराव खुडे, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब कऱ्हाळे, माजी शिक्षण सभापती संजय पाटील कऱ्हाळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार, कारीमभाई शेख, मुख्यमंत्री याचे स्वीय सहायक शरद किरवले, माजी नगरसेवक अशोक संगेवार माजी नगराध्ययक्षा आशाताई चव्हाण, चित्ररेखा गोरे , प्रा डी एम पवार, दिनेश तेललवार, यासह मान्यवर उपस्थित होते
हरिभाऊ चव्हाण व सौ इदूताई चव्हाण या दाम्पत्याचा यावेळी संस्थेअंतर्गत शाळेच्या वतीने खा प्रतापराव पाटील , आ हंबर्डे माजी आ चव्हाण संस्थेचे अध्यक्ष वसंतराव पवार यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी मुख्याध्यापक दामोदर वडजे, मुख्याध्यापक एच जी पवार, सुलतानखान यांची उपस्थिती होती जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील यांनीहरिभाऊ यांचे शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे त्यांनी आपल्या कौशल्याने सगळ्यांच्या सोबत ठेवले आहे येत्या काळात त्यांनी सांस्कृतिक क्षेत्रात आमच्या सोबत काम करावे असे त्यांनी सांगितले
आमदार मोहन अण्णा हंबर्डे, माजी आ रोहिदास चव्हाण, ऍड मुक्तेश्वर धोंडगे, यांनी हारीभाऊ चव्हाण यांच्या कार्याचा गौरव केला.सत्कार मूर्ती हरिभाऊ चव्हाण यानी आपले मनोगत व्यक्त केले .बँक मॅनेजर अमोल चव्हाण यांनी भाषण केले संचलन विक्रम कदम यांनी केले तर परिचय बी एन गवाले यांनी केले .प्रास्ताविक हरिहर धुतमल यांनी तर आभार रमेश पिठठलवाड यांनी केले.