दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड- गोविंद पवार
लोहा शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.
यावेळी सकाळच्या सत्रात लोहा शहरातील बैल बाजार मैदानातील बिरोबा मंदिराच्या सभामंडपात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मुर्तीस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करुन भंडारा उधळून मोटार सायकलीवर पिवळे झेंडे लावून बिरोबा मंदिरापासून लोहा शहरातील मुख्य रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
त्यानंतर दुपारच्या क्षेत्रात जुना लोहा येथून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मुर्तीची आरती करून त्यांच्या मुर्तीची भव्य मिरवणूक मुख्य रस्त्याने बिरोबा मंदिरापर्यंत काढण्यात आली. यावेळी आमदार शामसुंदर शिंदे, माजी आमदार रोहिदास चव्हाण, नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, माजी जि.प. सदस्य भगवानराव हाके, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा भाऊ नरंगले, दिपक पाटील कानवटे, नगरसेवक संदीप दमकोंडवार,जयंती मंडळाचे अध्यक्ष वैभवकुमार हाके उपस्थित होते.
तसेच लोहा शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पिवळ्या रंगाच्या भव्य कमानी लावण्यात आल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या गीताने लोहा शहर दुमदुमले .
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भगवानराव हाके, एकनाथ दादा पवार, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा भाऊ नरंगले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कराळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार, वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष धीरज भैया हाके , नगरसेवक पंचशील कांबळे, नगरसेवक संदीप दमकोंडवार, सचिन सावकार सुर्यवंशी, माजी नगरसेवक युवराज वाघमारे, शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन कराडे -गुंठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मंडळाचे अध्यक्ष वैभवकुमार हाके, वंचीत बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सतीश आणेराव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मिलिंद पाटील पवार, भाजपा युवा मोर्चा चे शहराध्यक्ष अविनाश पाटील पवार,संतोष गवारे, सरपंच तेजेराव बाजगीर, सरपंच मोहन पोले,अतुल धुळगुंडे, माधव डोईफोडे, गजानन नाईक, व्यंकट जंगले, मारोतराव जंगले, परमेश्वर पोले, संदीप बाजगीर, विठ्ठल कवडे, मारोती श्रीरामे, चेअरमन मषणाजी सुरनर, परमेश्वर सुरनर, देविदास जंगले पिंटू जंगले, कैलास शामे,दशरथ मनाडे, नागोजी नाईक
यांच्यासह मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.