दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड – गोविंद पवार
लोहा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड होत असल्यामुळे या वृक्षतोडीवर आळा घालण्यासाठी
केशव वाबाळे उपवनसंरक्षक नांदेड व भीमसिंग ठाकूर सहाय्यक वनसंरक्षक नांदेड तसेच एस डी शिंदे आर एफ ओ यांच्या मार्गदर्शनाखाली लोहा ते लातूर मार्गावर अवैद्य रित्या लिंब प्रजातीची लाकूड ट्रॅक्टरने वाहतूक होताना वन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी सदरील ट्रॅक्टर मुद्देमालासह जप्त करून योग्य ती कारवाई केली या कारवाईमध्ये ए एस क्यादरवाड वन परिमंडळ अधिकारी लोहा,परमेश्वर घुगे वनरक्षक,मंगरूळ लक्ष्मण पांडुरणे वनरक्षक रिसनगाव व नारायण शेवडीकर वन मजूर यांनी परिश्रम घेतले पुढील चौकशी ए एस क्यादरवाड हे करीत आहेतआज रोजी गुप्त माहिती मिळाल्यावर वनपाल रक्षक मंगरूळ स्टाफसह लोहा ते लातूर लातूर रोडवर पेट्रोलिंग करत असते वेळेस ट्रॅक्टर वाहन अवैधरित्या लिम प्रजातीचे लाकूड माल वाहतूक करीत असताना पकडले त्यांच्या विरुद्ध वन कायद्यानुसार गुन्हा नोंद केला वाहन व मुद्देमाल ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आरोपी परमेश्वर नामदेव रा तळ्याची वाडी ता कंधार जवळपास मुद्देमाल अंदाजी किंमत पाच लाख ४० हजार ७५० वजन ४४४० किलो जप्त केला.