दैनिक चालू वार्ता निलंगा तालुका प्रतिनिधी- इस्माईल महेबूब शेख
==================
निलंगा : तालुक्यातील जाजनुर येथिल आशा कार्यकर्ती राजश्री दत्तात्रय सूर्यवंशी यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा सन.2023- 24 चा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार ग्रामपंचायत कार्यालय जाजनुर यांच्या वतीने सरपंच काशीनाथ गोमसाळे, उपसरपंच सरोजा गुराळे, प्रतिष्ठित नागरिक विनायक गोमसाळे, यांच्या हस्ते सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा, यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन ,ग्रामपंचायत स्तरिय पुरस्कार देवून गौरविण्यात आले. राजश्री सूर्यवंशी यांना पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल पत्रकार किशोर सोनकांबळे, ॲड. गजानन लासुरे, माजी सरपंच गौतम सोनकांबळे, माजी सरपंच बालाजी गोमसाळे, सतीश सोनकांबळे, माजी खासदार प्रो. खा. सुनिल गायकवाड यांच्या सह ग्रामस्थांनी अभिनंदन केले.