दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम म्हणजेच ‘बालभारतीने यंदा पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांच्या पानांचा समावेश केला असून, त्याला माझी नोंद” असे शीर्षक दिले आहे. पाठ्यपुस्तकातील वह्यांच्या पानात करता येणाऱ्या २१ नोंदींची यादीच शिक्षकांना पाठविली आहे. वह्यांची पाने जोडण्यामागचे १५ फायदेही सांगितले आहेत.
संशोधन मंडळाने
“बालभारती’चे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी परिपत्रक काढून शिक्षकांना वह्यांच्या पानांच्या प्रभावी वापराबाबत मार्गदर्शन सूचना दिल्या आहेत.
अशा कराव्यात नोंदी
१. विद्यार्थ्याच्या ‘माझी नोंद मधील नोंदी समान असण्याचा आग्रह धरू नये.
२. विद्यार्थ्यांनी तारीखवार नोंदी3. वर्गातील चर्चेदरम्यान उपस्थित झालेले मुद्दे लिहून ठेवण्यासाठी उपयोग करावा.
४. शिकवताना अभ्यासातील महत्त्वाचे मुद्दे नोंदवून घेता येतील.
५. शिक्षकांनी सुचविलेले अधिकचे प्रश्न नोंदविण्यासाठी पानांचा उपयोग करता येईल.
६. काही संदर्भ, वर्तमानपत्रात आलेली विविध माहिती/ साहित्यांची नोंदी करावी.
प्रकारची
७. पाठाच्या अनुषंगाने वर्तमानपत्रे, माध्यमे आदींद्वारे प्रकाशित अवांतर करावी. माहिती लिहून ठेवावी.
८. पाठ्यपुस्तकांबाहेरील परंतु आशयाला पूरक माहितीची नोंद करावी.
९. चित्राकृती, चित्र, आलेख आकृत्या काढाव्या.
१०. पाठाला पूरक मुद्देही यावर लिहून ठेवता येतील.
११. कच्चे काम (पेन्सिलने), सूत्रलेखन, महत्त्वाचे संबोध, गणित सोडवण्याची वेगळी रीत मांडणे, पाढे तयार करणे, पडताळणी करणे अशा विविध कामांसाठी पानांचा उपयोग करावा.
१२ नियम, सूत्रे, घटना, संबंध, घटनाक्रम, आकृत्या, ओघतक्ता, संकल्पनाचित्र, मुक्तोत्तरी प्रश्नांची नोंद, तुलनात्मक नोंदी, व्यवहारिक अनुभव विश्वातील उदाहरणे नावीन्यपूर्ण उपक्रमांची नोंद, स्वनिर्मित उदाहरणांची नोंद यात नोंदीसाठी
१३. अध्ययन-अध्यापन प्रक्रियेदरम्यान उपस्थित झालेले प्रश्न लिहावेत.
१४. शब्दार्थ, प्रतिशब्द, संकल्पना, पर्यायी शब्द, वाक्प्रचार, जोडशब्द, म्हणी, भाषिक खेळ, भाषिक सौंदर्य असणारी वाक्ये, व्याकरणातील व्याख्या व उदाहरणे महत्त्वाचे
जोडशब्द, विरुद्धार्थी, समानार्थी शब्द. सुविचार, सुभाषित, ब्रीदवाक्ये, भाषिक खेळ, इंग्रजीतील शब्दांचे उच्चारण देवनागरी लिपीमध्ये लिहिणे.
१५. सहसंबंध लावण्यासाठी महत्त्वाच्या संकल्पना उतरवण्यासाठी, विस्तारित अर्थ नोंदवणे,
१६ रेखाकाम, ठसेकाम, चित्रकाम (इयत्ता पहिली ते पाचवीसाठी)
१७. विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना सुचलेल्या स्वतःच्या उदाहरणांच्या
१८. विषय शिकताना इतर विषयाशी आलेल्या सहसंबंधाची नोंद.
१९. गृहकार्य लिहून ठेवण्यासाठी. २०. विमर्शी किंवा चिंतनशील मुद्द्यांची नोंद करण्यासाठी.
२१ अध्ययन करताना आलेल्या शंका लिहून ठेवण्यासाठी.