दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी वडोद तांगडा-समाधान कळम
भोकरदन : तालुक्यात आगामी खरिप हंगामाची शेतकऱ्यांकडून जोरदार तयारी सुरू आहे. शिवाय मान्सुन देखील वेळेच्या आत हजेरी लावणार असल्याने शेतकरी वर्गात आनदांचे वातावरण आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बि-बियाणे मिळण्यासाठी कृषी विभागाकडून नियोजन आखण्यात येत आहे. यासाठी कृषी विभागाच्या वतीने खरीप पेरणीसाठी लागणारे आवश्यक बि-बियाणे दुकानदाराकंडून खरेदी करताना शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी बाळगत आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन खरीप पेरणीच्या तोंडावर कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
यंदा कृषी विभागाकडुन रब्बी पेरणीचे यशस्वी नियोजन आखण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी देखील खरीप पेरणीसाठी शेतीविषयक माहीतीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधणे गरजेचे आहे. दरम्यान कृषी विभागाची देखील बोगस बियाणे विक्रेत्यावर करडी नजर राहणार आहे. यावर्षी हवामान खात्याने मान्सुन जोरदार होणार असल्याचा अंदाज वर्तवीला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी युध्दपातळीवर शेती मशागत करण्यास सुरूवात केली असुन पेरणीसाठी जोरदार कंबर कसली आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजन युद्धपातळीवर सुरू केले आहे.
यावर्षी तालुक्यात जवळजवळ एक लाख नऊ हजार हेक्टरवर खरीपाच्या पेरणीचे नियोजन आहे. त्या दिशेने कृषी विभागाने देखील उपाययोजना सुरू केल्या आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी येणाऱ्या खरीप हंगामात खते- बि-बियाणे खरेदी करण्यासाठी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. यात शेतकऱ्यांनी परवानाधारक विक्रेत्याकडून बंद वेस्टन आतील लेबल असलेले बियाणे खरेदी करीत त्याची पावती, बिल खरेदी केलेल्या बियाण्याचा संपूर्ण तपशील तपासून घ्यावा. जसे की पिक वान संपूर्ण लॉट नंबर, वजन, बियाणे ज्या कंपनीचे आहे त्या कंपनीचे नाव बियाणे किंमत खरीदाराचे संपूर्ण नाव व पत्ता विक्रेत्याचे त्याचे नाव व सही इत्यादी नमूद असलेली रोखीने अथवा उधारीची पावती शेतकऱ्यांनी घ्यावी. दरम्यान बियाणे खरेदी करताना वैध मुदतीची खात्री करून घ्यावी व वैध मुदतीच्या आतील बियाणे खरेदी करावे पिशवी वर नमूद एमआरपी दरापेक्षा जास्त दराने बियाणे खरेदी करू नये बियाणे खरेदी ची पावती वेस्टन बॅग व त्यावरील लेबल टॅग इत्यादी जपून ठेवावे, बियाणे खरेदी करताना संबंधित विक्रेता जर उपरोक्त प्रमाणे संपूर्ण विवरणासहित बिल देत नसेल मुदतबाह्य बियाण्याची विक्री करीत असेल छापील किमतीपेक्षा अधिक दराने बियाणे विक्री करीत असेल तर यासंबंधी ची तक्रार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी किंवा संबंधित कंपनीच्या जिल्हा कार्यालयात लेखी स्वरुपात करावी. पेरणीसाठी खरेदी केलेल्या बियाण्याची पेरणी पर्यंत योग्य जागी साठवण करावी ओलसर जागी खता जवळ बियाण्याची साठवण करू नये. अशा विविध प्रकारचे मार्गदर्शन कृषी विभागाकडुन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. त्यामुळे दुकानदारांकडुन शेतकऱ्यांची होणारी लुट थांबण्यास मदत होणार आहे. दरम्यान यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथक नेमण्यात येणार आहे.