दैनिक चालु वार्ता परभणी शहर प्रतिनिधि- शेख इसाक.
सेलु येथे महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी उपक्रमाची मोठ्या सुरूवात करण्यात आली . या उपक्रमांतर्गत विविध शासकीय योजने अंतर्गत सेलु तालुक्यातील प्रात्र लाभार्थीना विविध योजनांतून मिळणाऱ्या शासकीय प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच विविध शासकीय विभागाअंतर्गत सुरू असलेल्या योजनांची माहिती देण्यात आली. पात्र लाभार्थीना धनादेशाचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी मा.आ.हरीभाऊ काका लहाने,जिल्हाधिकारी आचल गोयल, डॅा.संजय रोडगे,उपविभागीय अधिकारी अरूणा संगेवार, तहसीलदार दिनेश झांपले,गटविकास अधिकारी मोरे,मुख्यमंत्री कार्यालयाचे राहुल देशपांडे,यांचा हस्ते शासकीय योजनेअंतर्गत मिळणाऱ्या शासकीय मदतीच्या धनादेशाचे व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
सर्वसामान्य नागरिकांना शासनाचा विविध योजनांचा लाभ कमीत कमी कालावधी देण्या करिता शासकीय योजना लोकाभिमुख करून त्याची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी शासन आपल्या दारी या उपक्रमाव्दारे सेलु तालुक्यातील पात्र लाभार्थीना, आत्महत्या करणाऱ्या शेतकरी कुटूंबाला धनादेश, रेशन कार्ड, आयुष्मान कार्ड, संजय गांधी व श्रावण बाळ योजन, जेष्ठ नागरीक कार्ड, रहिवाशी व उत्पन्नाचे दाखले, जातीचे प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्रे आणि विवीध योजनेचे धनादेश वितरित करण्यात आले.
या प्रसंगी शासकीय कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते