दैनिक चालू वार्ता उपसंपादक मराठवाडा-ओंकार लव्हेकर
नांदेड —-महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षा २०२३ साठी कार्यरत प्राथमिक शिक्षकांसाठी वय मर्यादा व अन्य अटी कमी करण्यासाठी दिपक केसरकर शालेय शिक्षणमंत्री प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय ,आयुक्त शालेय शिक्षण विभाग पुणे यांना प्रसाद पाटील राज्याध्यक्ष, हरिश ससनकर राज्य सरचिटणीस यांच्या स्वाक्षरीचे निवेदनाव्दारे ईमेल केल्याची माहिती राज्य उपाध्यक्ष जी. एस.मंगनाळे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद प्रत्र.मरापप/ बापवि / २०२३/३५०४ दि. ५/६/२०२३ यांनी काढलेले होते.
केंद्रप्रमुख पदासाठी परिक्षा घेण्यात येणार आहे, मात्र यातील काही अटीमुळे कार्यरत प्राथमिक शिक्षकांवर अन्याय होत आहे, प्राथमिक शिक्षकांना सेवेत असतांना पदोन्नतीच्या अल्प संधी उपलब्ध असल्यामुळे सेवेत असतांना शैक्षणिक पात्रता वाढवून देखील त्यांना पदोन्नतीची संधी मिळत नाही आणि केंद्रप्रमुख पदोन्नती साठी उपलब्ध होत असलेल्या या एकमेव संधीमधील अटीमुळे ते वंचित राहत आहेत. या परिक्षा आयोजनात सुधारणा करण्यात याव्यात सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी ५० वर्ष वयोमर्यादा ठेवलेली आहे ती रद्द करण्यात यावी.पदवीला ५० टक्के गुणांची अट कमी करण्यात यावी.फॉर्म भरतांना पदवी कधी प्राप्त केली याबाबत अट नसावी.