दैनिक चालु वार्ता लातूर जिल्हा प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर:- भारताचे यशस्वी लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान होऊन 9 वर्षे पूर्ण झाले त्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने अहमदपूर विधानसभा मतदारसंघात महा जनसंपर्क अभियान 30में ते 30 जून या कालावधीत राबविले जात आहे. जनसंपर्क अभियाना अंतर्गत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या पुढाकाराने अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आज भव्य व्यापारी सम्मेलन आयोजित करण्यात आले होते .
भाजपाचे अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विकास कामची माहिती यावेळी उपस्थित व्यापाऱ्यांना या व्यापारी संमेलनातून दिली.
यावेळी माजी सभापती आर. डी. शेळके,
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जिवणकुमार मद्देवाड , चाकुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निळकंठ मिरकले ,भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी,सिनेट सदस्य अॅड. युवराज पाटील.अॅड.अमित रेड्डी. राहुल शिवपुजे,किशोर कोरे, अॅड.निखील कासनाळे,माजी तालुका अध्यक्ष रामभाऊ बेल्लाळे,ज्ञानोबा बडगिरे,डॉ.सिद्धार्थकुमार सुर्यवंशी ,शिवराज पाटील,यतिराज केंद्रे,संचालक विलास शेटे, मुस्तफा सय्यद,विलास पाटील, देविदास सुरणर,माजी उपसभापती कमलाकर पाटील,निळकंठ पाटील,बालाजी गुट्टे,भिमराव कदम, मुकेश पाटील,अशोक कासले,बाबाराव बारवाड, बाळु आकणगिरे,तुकाराम देवकते,राम देवकते,
यांच्यासह शहर व तालुक्यातील व्यापारी बांधव,भारतीय जनता पक्षाचे नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते