दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड – गोविंद पवार
लोहा – महाराष्ट्र ज्ञान महामंडळ पुणे (MKCL) व नांदेड जिल्ह्यातील अधिकृत एमएस- सीआयटी केंद्रांच्या संयुक्त सहयोगाने दहावी, बारावी विद्यार्थी, पालक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञानातील करिअर मार्गदर्शन शिबिरांचे दि.१४ जून २०२३ रोज बुधवारी सकाळी ९ वाजता श्रीनिवास मंगलकार्यालय, स्मशानभूमी समोर लोहा, येथे विना शुल्क आयोजन करण्यात आले आहे.
‘तंत्रज्ञानातील करिअरच्या वाटा २०२३’ या विषयावर एमकेसीएल चे डेप्युटी जनरल मॅनेजर डॉ. दीपक पाटेकर हे मार्गदर्शन करणार आहेत. दहावी, बारावी विद्यार्थी, पालक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन लोहा शहरातील एमकेसीएलचे एमएस-सीआयटी अधिकृत प्रशिक्षण केंद्राच्या संचालकांनी केले आहे.