दैनिक चालु वार्ता वैजापूर प्रतिनिधी– भारत पा.सोनवणे
वैजापूर- श्री संत शंकर स्वामी संस्थान पायी दिंडी सोहळा शिवुर ते पंढरपूर पालखीचे आज सकाळी प्रस्थान झाले. स्वामींच्या समाधीची विधीवत पुजा, अभिषेक करून भजनाला सुरुवात झाली , परंपरेप्रमाणे विठ्ठल मंदिरात दर्शन करून वाटचालीला प्रस्थान झाले.श्री ह भ प सारंगधर महाराज भोपळे शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली पायी दिंडी सोहळा संपन्न होत आहे. दिंडीसोबत ३०० भाविक आहेत.श्री संत शंकर स्वामी महाराज यांनी ३०० वर्षांपूर्वी मराठवाड्यातुन पहिली दिंडी काढुन अध्यात्मीक चळवळ उभी केली.सर्वसामान्य माणसाच्या मनाची मशागत करून माणसांच्या अंगात माणुसकी, प्रेम निर्माण व्हावे यासाठी लोकशाही मार्गाने जाऊन भक्तीमार्ग निर्माण केला. यावेळी महंत भोलेगिरी महाराज, ज्ञानेश्वर महाराज मधाने, कृष्णा महाराज सांळुके,बाळु मी पेडेफळ,यांचे हस्ते पालखीचे पुजा केले,संस्थानचे अध्यक्ष एकनाथराव जाधव, सचिव बबनराव जाधव, कार्याध्यक्ष पोपटराव जाधव, विश्वस्त नितीन शेठ चुडीवाल, मधुकरराव पवार, शिवाजी साळुंके, रामभाऊ महाराज मगर, रामभाऊ दादा, परिसरातील वारकरी भाविक उपस्थित होते