दैनिक चालु वार्ता उपसंपादक छत्रपती संभाजीनगर – मोहन आखाडे
राज्यातील काही भागात जातीय तणावाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पोलीस प्रशासनाने पर्यन्त करूनही सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकण्याचे प्रकार सुरूच असून हे रोखण्यासाठी छ. संभाजीनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या गावात/परिसरात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून वादविवाद पसरवणारे संदेश, व्हिडिओ, ऑडिओ, संशयित किंवा पोस्ट यांची माहिती घेतल्यानंतर त्यांनी तत्काळ स्थानिक पोलिसांकडे तक्रार करावी.
विनाकारण असे व्हिडीओ, मेसेज, व्हायरल करून जाणूनबुजून अशा अफवा पसरवणारी कोणतीही व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर कलम १५३, १५३ (अ), २९५ (अ) अन्वये तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येईल आणि अशा व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
*प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी पोलीस सक्षम आहेत*
पोलिस प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यास सक्षम असून सायबर पोलिसांचे पथक तंत्रज्ञान आणि विशेष उपकरणांच्या मदतीने सर्व प्रकारच्या सोशल मीडिया साइटवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे एसपी म्हणाले. जुन्या वादग्रस्त प्रकरणातील काही समाजकंटक सोशल मीडियाच्या माध्यमातून बिनबुडाच्या आणि खोट्या अफवा पसरवून अशांतता निर्माण करून जाती आणि दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी समाजकंटकांकडून निरपराध तरुणांच्या मनात इतरांबद्दल द्वेष निर्माण करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब केला जातो. यामुळे, पालकांनी आपल्या मुलांवर बारीक लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून ते कोणत्याही सोशल मीडियावर प्रक्षोभक किंवा सामाजिक आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करू नयेत.
तसेच विद्यार्थीनी सुध्दा सोशल मिडियाचा वापर करतांना कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जातील अशा प्रकारच्या कोणत्याही सोशल मिडीयावरिल पोस्ट ला स्टेटला ठेवु नये किंवा पुढे फॉरवर्ड करून नये. अशा प्रकारची कृती त्यांचे कडुन झाल्यास त्यांचे विरुध्द गुन्हे दाखल होवुन चारित्र्य प्रमाणपत्रावर गुन्हयाची नोंद झाल्याने भविष्यातील चांगल्या नौकरी अथवा व्यवसायाच्या संधीस त्यांना मुकावे लागते.
त्यामुळे सोशल मिडीयाचा जबाबदारीने वापर करून तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट बनवु नये अगर फॉरवर्ड करू नये, तसेच कोणत्याही पोस्ट ला प्रतिक्रिया देतांना संयम बाळगावा घायी घायीने प्रतिउत्तर देतांना अपशब्दांचा वापर झाल्यास हा सुध्दा अपराध आहे, कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रध्दांचा अपमान करून धार्मिक भावना दुखावण्याचे उद्देशाने बुध्दिपुरस्सर व दृष्ट उद्देशाने तोंडी किंवा लेखी शब्दांनी अगर चिन्हाद्वारे तसेच दृश्य देखाव्याद्वारे (Visible Representation) त्या वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रध्दांचा अपमान करणा-या व्यक्तीला नमुद कलमा नुसार 3 वर्षा पर्यंत कारावास व दंड शिक्षा होवु शकते.