दैनिक चालु वार्ता ग्रामीण प्रतिनिधी -माणिक सुर्यवंशी.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती कुंटूर येथील श्री.खंडोबा मंदिरात येथे साजरी झाली. महोत्सवाच्या वतीने व्याख्यान आयोजित करून जयंती साजरी करण्यात आली. सकाळी 9 वा. ध्वजारोहण उपसरपंच मा.शिवाजी पा.होळकर यांच्या हस्ते व मा.रुपेश कुंटूरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.सकाळी ठीक 10 वाजता व्याख्यानाचा कार्यक्रमाची सुरुवात झाली.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व्याख्यानास सुरुवात झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
जि.प.चे माजी सदस्य, चारवाडीचे सरपंच मा. सुर्याजी पा.चाडकर,हे होते.
व्याख्याते मा.बालाजी वरवटे,धावरीकर, मा.बालाजी पेटेकर खतगावकर,प्रा.डाॅ.गो.रा.परडे सर यांचे अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारे व्याख्यान झाले.
प्रमुख पाहुणे, पं.स. माजी उपसभापती,मा. सुर्यकांत पा.कदम,
जि.प.चे माजी सदस्य, मा.माणिकराव लोहगावे,
मा.मारोतराव पा.कदम कुंटूरकर,मा.बालाजी पवार, मा. बालाजी नारे सर या सर्वांच्या उपस्थितीत जयंती उत्सव साजरी करण्यात आली.
जयंती मंडळाचे
अध्यक्ष,दत्ता शिंगणे,उपध्यक्ष,बालाजी देवदे,सचिव:सुधाकर होळकर,कोमराजी संभाडे व सर्व युवा मल्हार सेनेचे पदाधिकारी,महिला, युवक,जेष्ट मंडळी, सर्व समाजबांधव,गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुनील होळकर यांनी केले तर आभार मोहनराव होळकर यांनी मानले.
सायंकाली 5,वाजता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक काढण्यात आली.यावेळी परिसरातील युवा मल्हार सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.