दैनिक चालु वार्ता गंगापुर प्रतिनिधि-
गंगापुर : रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना विभाग 15 वा वर्धापन दिनानिमित्त रवींद्र नाट्यगृह दादर मुंबई येथे कार्यक्रम थाटामाटात पार पडला योगेश परुळेकर साहेब यांनी आपले विचार मांडले.यानंतर हिंदू जननायक राज साहेब ठाकरे यांनी मार्गदर्शन केले याचबरोबर याचबरोबर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील जातवा गावातील ग्राम संघटक म्हणून योगेश पवार यांना माननीय परुळेकर साहेब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब अवघडे साहेब, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी साहेब, जिल्हा संघटक अशोक पवार पाटील मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष मनोज पुंडेकर,जिल्हा सचिव हेमंत जाधव, उपजिल्हासंघटक संदीप आराख, उपजिल्हा संघटकअशोक कराळे पाटील,तालुका संघटक संतोष लाड, तालुका संघटक अमोल पाटील,प्रदीप कापसे पाटील ग्राम संघटक,विठ्ठल बनकर ग्राम संघटक,योगेश पवार ग्राम संघटक,सागर पारे,ईश्वर गोरे,कार्तिक थोरे,गोरख पवार,गणेश वाघ राजू बनकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.