दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- कंधार तालुक्यातील येलूर येथील भारतीय जनता पक्षाचे पेठवडज सर्कलचे युवा नेते
श्री. ज्ञानेश्वर पाटील शिंदे येलूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १५ जून २०२३ रोज गुरूवारी उपजिल्हा रूग्णालय मुखेड येथे दुपारी १२ वाजता रूग्णांना फळे वाटप.आणि श्री.संत बाळगीर महाराज हायस्कूल येथे दुपारी २ वाजता विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहेत.तसेच रात्री ८ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाढदिवस साजरा केला जाणार आहे तरी कोणाला निमंत्रण पत्रिका मिळाली नसेल तर हेच निमंत्रण समजून अभिष्टचिंतन सोहळ्याला येलूर येथे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे ज्ञानेश्वर पाटील शिंदे येलूरकर यांनी आव्हान केले आहे