दैनिक चालु वार्ता कौठा वार्ताहार: प्रभाकर पांडे
कौठ्याजवळ असलेल्या धानोरा येथील जि.प शिक्षक उत्तमराव जाधव यांचे जेष्ट चिरंजिव ओमकेश पाटील जाधव यांनी एमपीएस्सी परिक्षेत यश संपादन केले असुन त्याची लेबर आॅफीसर वर्ग-2 पदी नियुक्ती झाली.
ओमकेश हा लहानपणा पासुनच जिद्दी अभ्यासु मुलगा. तो स्काॅलरशिप परिक्षा पात्र, नवोदय परिक्षा पात्र, नंतर त्याने अभियांत्रीकी शिक्षण घेवुन अभियंता बनला पण त्याला प्रशासकीय सेवेत रस असल्याने त्यांने सारथी संस्थेच्या मदतीने स्पर्धा पराक्षेची तयारी केली. पण त्याच्या परिश्रमाला कोरोना सारख्या राक्षसी बिमारीने विलंब लावला.
त्यांने मिळवलेल्या यशाबद्दल विचारणा केली असता त्याच्या यशाचे श्रेय त्याचे आईवडील, गुरु आणि सारथी संस्थेला दिले आहे. त्याच्या यशाबद्दल सर्वाकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत असुन गावचे सरपंच प्रतिनिधी संजय हात्ते, उपसरपंच शिवराज पा.जाधव प्रतिष्ठित नागरिक व शिक्षक माधवराव माली पा.जाधव, गणेशराव पा.जाधव, ईश्वरराव पा.जाधव, मोहनराव पा.कदम, निळकंठ पा.हात्ते, रावसाहेब पा. शेळगावे, मारोती पा. गव्हाणे, राहुल सोनकांबळे, नागोराव साहेब नवघरे, दौलत पा.गोरठे, रंजित पा. जाधव सर्व गावकर्यांनी व आप्तस्वकीयांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.