दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर (प्रतिनिधि): काल 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त 52 महाराष्ट्र बटालियन च्या देगलुर एनसीसी विभागाकडून शहरात रॅली काढण्यात आली.यावेळी रक्तदान संदर्भात वेगवेगळ्या घोषणा व फलक द्वारे जनजागृती करण्यात आली.
यावेळी येथील देगलूर महाविद्यालय व मानव्य विकास विद्यालयाचे एनसीसी विभागाचे कॅडेट उपस्थित होते.
शहरातील मुख्य मार्गावरून रॅली काढण्यात येऊन ती मानव्य विकास विद्यालयातील प्रांगणात विसर्जित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी 52 महाराष्ट्र बटालियन नांदेड चे सुभेदार गणेश सिंग हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संतोष कोल्हे, सगरोळी सैनिक स्कूल चे मंगेश कुलकर्णी, देगलूर महाविद्यालयाचे एनसीसी विभाग प्रमुख डॉ.नीरज उपलंचवार हे उपस्थित होते.तर प्रमुख वक्ता म्हणून भूगोल विभाग प्रमुख गोविंद पवार हे उपस्थित होते. त्यांनी जागतिक रक्त दाता दिवस व पूनित सागर अभियान अंतर्गत महासागराविषयी व त्यातील मौल्यवान खानिजविषयी विस्तृत माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश पारसेवार यांनी केले तर आभार श्याम कोल्हे यांनी मानले.