दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर – दि.१५/०६/२३ .भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित परमपूजनीय गोळवलकर गुरुजी प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शाळेविष यी आवड व ओढ निर्माण व्हावी व शाळेबद्दलची भिती दूर व्हावी म्हणून शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तक वितरनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी स्थानिक सभेचे अध्यक्ष चंद्रकांत जी रेखावार ,कार्यवाह प्रकाशसेठ चिंतावार, सहकार्यवाह गिरीषभाऊ गोळे,शालेय समिती अध्यक्षा शिल्पाताई अटकलीकर,सदस्य भागवतजी तम्मेवार व मुख्याध्यापक देगावकर व केंद्रे उपस्थित होते.
मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.सर्व मान्यवरांचे पुष्प देऊन शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.इयत्ता पहिलीचया नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्प व फुगा देवून औक्षण करून ,त्यांच्या हातचे ठसे उमटवून स्वागत करून त्यांचा उत्साह वाढविण्यात आले.सर्वच विद्यार्थ्यांना शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
अशा विविध उपक्रमांतून संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे स्वागत करून नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाच्या यशश्वीतेसाठी सचिन जाधव,सविता बेजगमवार , स्मिता कुलकर्णी,अर्चना सुरशेट वार,रुपा पांचारे, सुरेखा तोटावार,स्वाती पांचाळ यांचे सहकार्य लाभले. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात सर्व विद्यार्थ्यांना गोड साखर भात वाटप करून करण्यात आले.