दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: केरुर ते आदमपूर पाटी दरम्यानची घटना नांदेडहून हैदराबादकडे
जाणाऱ्या पोलिस जीपला देगलूरहून नांदेडकडे जाणाऱ्या मारोती (ओमिनी) व्हॅनने दि. १६ जून रोजी सायंकाळी ५.२० च्या दरम्यान जोरदार टक्कर दिली. या अपघातात पोलिस जीप क्रमांक एमएच २६ बीएक्स ६८७६ या वाहनातील गृह पोलीस उपाधीक्षक ‘डॉ. अश्विनी जगताप जखमी झाल्या आहेत तर एमपी २० सीसी ८२९० ओमिनी व्हॅनचा चालक गंभीर जखमी झाला आहे. जगताप यांना उपचारासाठी नांदेडला पाठविण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
गृहपोलिस उपअधीक्षकडॉ. अश्विनी जगताप या शासकीय कामानिमित्त नांदेडहून शासकीय वाहनाने शुक्रवारी सायंकाळी हैदराबादला होत्या. जात हैदराबादहून त्या विमानाने पुढील प्रवास करणार होत्या. शुक्रवारी, १६ रोजी सायंकाळी ५.१५ ते ६च्या दरम्यान त्यांच्या वाहनाला देगलूरहून नांदेडकडे जाणाऱ्या ओमनी व्हॅनने धडक दिली. हा अपघात केरुर ते आदमपूर कमान पाटीजवळ घडला. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून डॉ. अश्विनी जगताप यांना किरकोळदुखापत झाली आहे. डॉ. जगताप यांच्या शासकीय वाहनाचा क्रमांक एमएच २६ बिएक्स ६८७६ असा आहे तर ओमनी व्हॅनचा क्रमांक एमएच २० सीसी ८२९० असा आहे. या अपघाताची माहिती मिळताच
देगलूरचे पोलिस निरीक्षक सोहन माच्छरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अश्विनी जगताप व त्यांच्या वाहन चालकाने रामतीर्थ पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली व वैद्यकीय तपासणीचे पत्र घेऊन नायगाव व नंतर नांदेड गाठले. या अपघातात ओमनी व्हॅनचा चालकही गंभीर जखमी झाला आहे, याबाबत रामतीर्थ (शंकरनगर) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती सूत्राने सांगितले