दैनिक चालु वार्ता उपसंपादक अमरावती-श्रीकांत नाथे
अमरावती :तीर्थक्षेत्र कौंडण्यपुर या तीर्थस्थळाची विभागीय आयुक्त डॉ.निधी पाण्डेय यांनी यावेळी पाहणी केली असता विकास आराखड्यातील प्रलंबित कामे पूर्णत्वास जाण्यासाठी सर्वकष प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
तीर्थक्षेत्र कौंडण्यपूर विकास आराखड्यातील अनेक कामे पूर्ण झाली आहे.मात्र;मंदिर परिसरातील भक्त निवास,वाहनतळ,नदी घाट व इतर स्थापत्य कामे अद्यापही अपूर्ण आहेत.ही अपूर्ण कामे पूर्ण होण्यासाठी प्रभावी नियोजन आवश्यक असून त्याकरिता आढावा बैठक लवकरच घेतली जाईल असे विभागीय आयुक्त डॉ.निधी पाण्डेय यांनी यावेळी सांगितले.आराखड्यांतर्गत विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करतेवेळी याबाबत विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून कामे वेगाने पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करण्याची निर्देश त्यांनी यावेळी दिले.
कौंडण्यपूर हे प्राचीन तीर्थक्षेत्र असून येथील विकास आराखड्यातील कामे प्राधान्याने व कादंबरी पूर्ण होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला विभागीय आयुक्त डॉ.निधी पाण्डेय यांनी दिले.यावेळी तहसीलदार वैभव फरताडे व कार्यान्वयत यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.