दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी वाशिम-दिनकर गडदे
वाशिम / मंगरूळपीर तालुक्यातील धोत्रा गावाचे जवान . योगेश सुनील आडोळे यांची काल 9 वाजताच्या सुमारास कारंजा – मंगरूळपीर महामार्गावर पोटी फाट्याजवळ अपघात होऊन घटनास्थळी त्यांचे निधन झाले. योगेश हे भारतीय सैन्य दलात मागील चार वर्षापासून कार्यरत होते. भारतीय सैन्यात भरती होऊन देश सेवा करण्याची त्यांची मोठे स्वप्न होते. 24 वर्षीय योगेश सुनील आडोळे हे जम्मू काश्मीर मधील राजुरी येथे ते कार्यरत होते 2019 साली ते भारतीय सैन्यात दाखल झाले. महिनाभर सुट्टी घेऊन योगेश दोन दिवसांपूर्वीच गावी आले होते. काल दुपारी मित्रासोबत एका लग्न समारंभात गेल्यानंतर सायंकाळी गावी परतले व रात्री काही किरकोळ साहित्य घेण्यासाठी महामार्गावर आले होते.त्याच दरम्यान मंगरूळपीर वरून कारंजा कडे जाणार MH27BX1191 या क्रमांकाचा भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली यात योगेशला जबर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अत्यंत हुशार आणि मनमिळाऊ असलेल्या योगेश प्रचंड मेहनतीच्या जोरावर भारतीय सैन्यात भरती होण्याची स्वप्न पूर्ण केले होते. योगेश हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता योगेशच्या घरची परिस्थिती जेमतेमच असून त्यांच्या पगारावरच घर चालत होते.त्यांच्या पश्चात घरी त्यांची आई एकटीच राहते तर लहान बहिणीचे लग्न झाले आहे. योगेशच्या परिवारासह संपूर्ण गावावर मोठी शोककळा पसरली आहे. पुलगाव येथील सैन्याच्या अधिकारी गावात दाखल झाले असून सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांच्यावर धोत्रा या गावी त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहे.