दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी परंडा- धनंजय गोफणे
परंडा:- येथील महात्मा गांधी विद्यालयातील इयत्ता दहावीचा निकाल ९२.८५ % इतका लागला असून सेमी इंग्रजीचा 100% निकाल लागला आहे.परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी 196 होते त्यापैकी 182 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.90% पेक्षा जास्त गुण मिळवलेले एकूण विद्यार्थी 20, विशेष प्राविण्य मिळविलेले एकूण विद्यार्थी 68, प्रथम श्रेणीमध्ये 54 विद्यार्थी व उत्तीर्ण श्रेणीमध्ये 40 विद्यार्थी आहेत.शाळेतून प्रथम क्रमांक कु.वैष्णवी प्रदीप कोकाटे-96.20%, शाळेमधून द्वितीय क्रमांक कु.सानिका शिवाजी क्षीरसागर-95.80% व कु.आदिती नाईकवाडी -95.80% व प्रशाले मधून तृतीय क्रमांक कु.करण रामचंद्र घोगरे-94.80% ,
कु.शिवतेज नलवडे-94%, कुमारी मोहिनी मेहेर 93%, कुमारी ऋतुजा हजारे 93%, कु.स्वप्निल चव्हाण-92.80%, कु.भाग्यश्री ओव्हाळ-92.40%, कु.मयुरी गोफणे-92.20%, कु.गौरी बोंबलट-92.20%, कु.वैष्णवी पाटील-92%, कु. शंभुराजे नलवडे-91.60%, कु.अंकिता नलवडे-91.40%, कु.स्नेहा नरसाळे-91.20%, कु. कृष्णा शिंदे-90.80%, कु. अजित कोकाटे-90.60%, कु.अमन मुजावर-90.40%, कु.ओम धनवे-90.20%, कुमारी संस्कृती कुलकर्णी-90.20% मार्क घेऊन यश मिळविले.या सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक घाडगे आर .के. व प्रमुख पाहुणे डॉ. कुलकर्णी डी .आर. वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय, डॉ.अश्विनी शिंदे वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय परंडा या होत्या.सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आला.
त्यावेळी प्रशालेचे सर्व शिक्षक,पालक,बहुसंख्येने महिला पालक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.ठाणांबीर मॅडम,सूत्रसंचलन कोकणे एन.एस.यांनी केले व आभार प्रदर्शन प्रशालेचे उपमुख्याध्यापक लोकरे बी.एम.यांनी केले.