दैनिक चालु वार्ता,हिमायतनगर
प्रतिनिधी राम चिंतलवाड:–
मौजे वारंगटाकळी येथील सिमेंट रस्त्याचे कामअतिशय निकृष्ट दर्जाचे करीत असुन,या कामावर संबंधित शाखा अभियंता आला नाही.फक्त नांदेडवरुनचं कामाची माहिती घेतात असा पण आरोप गांवकरी करीत आहेत.या सिंमेट कामावर गावक-यांचे त्या कामावर लक्ष गेल्यामुळे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करत असताना, हे काम जाणकार व्यक्तीने थांबुन,संबंधित गुत्तेदार यांना कळवण्यातआले.गावकर्राचेअसे म्हणणे आहे की,सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता सुध्दा या कामावर कधीच आलेला नाही.तर उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय हिमायतनगर व संबंधित गुत्तेदार यांचे हितसंबंधआहेत काय?असा सवाल गांवकरी यावेळी बोलत आहेत.गावकऱ्यांनी बोलताना असे सांगितले की,रस्ता चांगल्या दर्जाचा मजबूत टिकाऊ झाला पाहिजे. गावाला पुन्हा निधी उपलब्ध होणार नाही.आपल्या सगळ्याची जबाबदारी आहे.असे बोलुन दाखवले.आहे. गावातील निकृष्ट दर्जाचे काम थांबविण्यासाठी खालील नागरिकांची गर्दी जमली होती गावातील पोलीस पाटील अवधुत कदम ,माजी सरपंच प्रकाशआनंदराव हाके,गजानन कनोटे, आकाश कदम,कृष्णाआंबेपवाड, निकेश हाके,दत्ता पवार,चापाजी विलास हाके,राम गिरी,दत्ता कुरलुपवाड,अवधुत किसनराव हाके, दिलीप राचुटकर,आवधुत विठ्ठल कदम, माधव कानोटे,अवधुत देवराव हाके,माधव तोक्कलवाड अशा अनेक गावकऱ्यांनी काम पाहण्यासाठी गर्दी केली