दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर:देगलुर बिलोली विधानसभेचे आमदार जितेश रावसाहेब अंतापुरकर यांनी देगलुर तालुक्यातील मानुर येथे विविध विकास कामांचा आढावा घेतला. गावालगतचा सिमाभागास जोडणारा पुलाच्या बांधकामाची पाहणी केली. तसेच गावातील स्थानिक विकास कार्यक्रम निधीतून सि. सी रस्ता बांधकामाचे भूमिपूजन केले. तसेच मुस्लिम समाजातील सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. आणि गावातील जि. प. शाळेला भेट दिली विद्यार्थ्याच्या गुणवत्तेविषयी शिक्षकांना विचारपूस करण्यात आली.तसेच गावकऱ्यांच्या समस्या संबंधित संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे प्रशांत पाटील आचेगावकर काँग्रेस कार्यकर्ते,व पदाधिकारी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते