गोविंद पवार उपसंपादक नांदेड
लोहा शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या नियोजित जागेचे लवकरच सुशोभीकरण करून पुतळ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे प्रतिपादन लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी केले.
लोहा शहरातील गोरोबाकाका मंदीर परिसर जूना लोहा नवी आबादी या ठिकाणी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त सामाजिक कार्यकर्ते शिवराज दाढेल लोहेकर यांच्या पुढाकारातून आयोजित कार्यक्रमात प्रथमतः अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे व सर्व महामानवांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.
नंतर मान्यवरांचा पुष्पहार व लाल दोस्ती घालून आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
पुढे बोलताना लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी म्हणाले की, मातंग समाजातील विविध प्रलंबित असलेले प्रश्न लवकरच मार्गी लावू व समाजाला न्याय मिळवून देणार असल्याचेही ते म्हणाले.तसेच येत्या काळात गोरोबाकाका मंदिर परिसरात सांस्कृतिक सभागृह उभारणी करण्याची ग्वाही नगरसेवक करीम शेख यांनी दिली.
यावेळी ज्येष्ठ नगरसेवक बबन निर्मले,नगरसेवक भास्कर पाटील पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष रमेश माळी,यांनीही अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.
प्रसंगी नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण,जिवन पाटील चव्हाण,नगरसेवक अमोल व्यवहारे, नगरसेवक नबीसाब शेख, नगरसेवक केतन खिल्लारे, नगरसेवक नारायण यलरवाड, ख.वि.संघाचे संचालक तथा माजी सरपंच भिमराव पाटील शिंदे,किशनराव पाटील मुरकुटे, राष्ट्रवादी,युवक कांग्रेस तालुकाध्यक्ष शिवराज पाटील,लक्की फुलवरे,अजमत शेख ,ज्ञानेश्वर भिसे,अमोल कांबळे,निलेश देशमाने सह बहुसंख्येने समाज बांधव, महिला संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक शिवराज दाढेल यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा.माधवराव भिसे यांनी मानले.