दैनिक चालू वार्ता
उप संपादक उस्मानाबाद
नवनाथ यादव
उस्मानाबाद:-लहुजी शक्ती सेना युवक आघाडी भूम यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर विश्वभूषण डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त सोजर मूकबधिर शाळा भूम येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी लहुजी शक्ती सेना धाराशिव युवक जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ साठे, युवक तालुका अध्यक्ष संतोष भाऊ मिसाळ, भूम शहराध्यक्ष अनुरथ भाऊ कसबे, भूम शहर उपाध्यक्ष कांतीलाल साठे आधी लहू सैनिक, व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते