संतोष ज्ञानोबा भसमपुरे
अहमदपूर लातूर
दैनिक चालू वार्ता चा द्वितीय वर्धापन दिन दिनांक 28 जुलै रोजी पुणे येथे साजरा करण्यात आला .त्यानिमित्ताने महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रतिनिधी आणि दैनिक चालू वार्ता चे मुख्य संपादक यांच्या उपस्थितीत हा वर्धापन दिन मोठया संख्येने आणि आनंदाने साजरा करण्यात आला.याच दिनाचे औचित्य साधून दैनिक चालू वार्ता चे संपादक श्री डी. एस.लोखंडे पाटील यांनी श्री मारकवाड यांची लातूर जिल्हा प्रतिनिधी पदी नियुक्ती केली .दैनिक चालू वार्ता या अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या वर्तमानपत्रातील अविरत आणि अतिशय प्रामाणिकपणे काम केल्याबद्दल त्यांची नियुक्ती लातूर जिल्हा प्रतिनिधी पदी करण्यात आली आहे .त्यानिमित्ताने सम्राट मित्र मंडळ अहमदपूर च्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला .त्यात प्रमुख उपस्थिती म्हणून सम्राट मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री सिध्दार्थ कुमार सुर्यवंशी सर ,अजय भालेराव ,श्री चापोलिकर सर,पांडुरंग पांचाळ, सचिन बनाटे,प्रशांत दाभाडे होते.श्री सिध्दार्थ कुमार सुर्यवंशी यांनी श्री मारकवाड यांचा शाल आणि पुष्पहार घालून सत्कार केला .याच अनुषंगाने दैनिक चालू वार्ता परिवाराकडून तसेच त्यांच्या मित्र परिवारातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.