दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई जिल्हा प्रतिनिधी किशोर फड
संघांना सहभागी होण्याचे आवाहन : जेष्ठ नेते श्री नंदकिशोर (काकाजी) मुंदडा…
अंबाजोगाई येथील वसुंधरा सेवा प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. विमल मुंदडा यांच्या जयंतीनिमित्त ता. ११ ते १५ ऑगस्ट दरम्यान भजन गायन, आराधी गीतगायन व देशभक्तीपर समूह नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या सर्व स्पर्धेत सर्व संघांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
ताई महोत्सवाचे यंदाचे २० वे वर्षे आहे. नगर पालिकेच्या आद्यकवी स्वामी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात या सर्व स्पर्धा होणार आहेत. सांप्रदायिक भजन स्पर्धा ही ता. ११ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता सुरू होईल. समूह आराधी गायन स्पर्धा ता. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता होईल. देशभक्तिपर समूह नृत्य स्पर्धा ता. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता सुरू होईल. ही स्पर्धा लहान आणि मोठा गटात होणार आहे. संघांनी नाव नोंदणीसाठी प्रकाश बोरगावकर, बळीराम चोपडे, अनंत आरसुडे, इनामदार गुरुजी, महादेव सूर्यवंशी, डॉ. वासुदेव नेहरकर, सतीष मुळे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन वसुंधरा सेवा प्रतिष्ठानतर्फे श्री नंदकिशोर काकाजी मुंदडा व आमदार नमिता ताई मुंदडा यांनी केले आहे.