केंद्रात व उपकेंद्रात डोळ्याच्या ड्रॉपचा तुटवडा…
देगलूर: देगलूर शहर व देगलूर ग्रामीण भागामध्ये डोळे येण्याची साथीचे प्रसार खूप मोठ्या प्रमाणात होत असून लहान मुलांमध्ये या रोगाचे जास्त प्रमाणात प्रसार दिसून येत आहे .या रोगावर रामबाण उपाय म्हणून या डोळ्याच्या ड्रॉप चे देगलूर उपजिल्हा रुग्णालय व तालुक्यातील आरोग्य केंद्रावर याचा तुटवडा जाणवत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या वीस ते बावीस वर्षा पूर्वीचा डोळ्याचा रोग आता दिसून येत असून सदरचे कारण म्हणजे पावसाळ्यात जेव्हा पाऊस पडत नसतो तेव्हा काही ठिकाणी चक्क उकाडा असतो हवेतील दमटपणा ही या ऋतूत वाढलेला असतो हे वातावरण संसर्गजन्य रोगांसाठी पोषक असते सर्दी पडसा खोकला ताप अशा आजारा बरोबरच दर वर्षी या दिवसांत डोळे येण्याची ही साथ पसरते या आजाराला ‘कंजंक्टिव्हायटिस’ असे ही म्हटले जात आहे आरोग्य विभागाच्या मार्फत पूर्वी म्हणजे वीस ते बावीस
वर्षाखाली घरात चिरट ढेकूण झुरळ आदी कीटक
नाशकाची उत्पती होऊ नये म्हणून घरात फवारणी मारले
जात होते नाल्यात फवारणी केली जात होती परंतु गेल्या
अनेक वर्षा पासून फवारणी केली जात नसल्यामुळे
नागरिकाचे आरोग्य ? धोक्यात आले असल्यामूळे तात्काळ
फवारणी करण्यात यावी अशी मागणी होत आहे डोळे आलेल्या व्यक्तीच्या दीर्घकाळ संपर्कात येणे, तसेच अशा व्यक्तीचा रुमाल, त्याने वापरलेले डोळ्यांचे ड्रॉप्स अशा वस्तू वापरणे, यामुळे निरोगी व्यक्तीलाही या साथीचा संसर्ग होण्याची शक्यता असते म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे
डोळे येण्याचा संसर्ग कसा होतो ? “””
डोळे येण्याचा संसर्ग सामान्यत: प्रथम एकाच डोळ्याला होतो. पण एक डोळा आल्यानंतर दुसऱ्या डोळ्यालाही संसर्ग होतोच. एकदा व्यक्तीचे डोळे येऊन गेले की पुन्हा डोळे येण्याचा संसर्ग होत नाही असे म्हटले जाते, त्यात तथ्य नाही. एकदा डोळे येऊन गेले की त्या साथी विरोधात शरीरात प्रतिकारशक्ती तयार होते हे खरे, पण म्हणून पुन्हा संसर्ग होणारच नाही असे नाही परंतु जास्तीची काळजी घेणे आवश्यक आहे
‘डोळे आले आहेत कस ओळखाव ?
डोळ्यांना संसर्ग झाल्याचे ओळखणे फारसे कठीण नाही. डोळ्यांत सतत काहीतरी गेल्याची भावना होणे, डोळ्यांतून पाणी आणि घाण येणे, डोळा लाल होणे ही डोळे येण्याची सामान्य लक्षणे आहेत ही लक्षणे आधी एका डोळ्याला आणि नंतर दुसऱ्या डोळ्याला दिसू लागतात संसर्गामुळे डोळ्यांच्या आतल्या कोपऱ्यांना आणि पापण्यांच्या आतल्या भागांना सूज येऊन ते लाल दिसू लागतात
डोळ्यांतून पाणी येऊन किंवा ‘पस’ सदृश घाण येऊन प्रसंगी
पापण्या चिकटतातही काही वेळा डोळ्यांना खाज येते, डोळे
जड वाटतात. एकदम तीव्र प्रकाश डोळ्यांना सहन होत नाही
काहींना कानांच्या समोरील भागातील ग्रंथींनाही सूज येते
विशिष्ट प्रकारच्या विषाणू संसर्गामुळे डोळे येण्या बरोबरच ताप
सर्दी घसा दुखणे या तक्रारी ही जाणवतात या लक्षकडे असणने
आवश्यक आहेडोळे येण्याचा संसर्ग जीवाणूजन्य असेल तर त्यामुळे दृष्टीवर सहसा काहीही परिणाम होत नाही संसर्ग विषाणूजन्य असेल तर डोळ्यांना तात्पुरते अंधुक दिसणे, तीव्र प्रकाशाचा त्रास होणे ही लक्षणे दिसू शकतात हा गंभीर आजार नव्हे पण काळजी घेतली पाहिले. प्रशासनाने सर्व आरोग्य केंद्रावर ड्रॉप ची उपलब्ध करून द्यावी अशी चर्चा जनतेतून होत आहे.