दै.चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर: दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी सप्तगिरी पोदार लर्न स्कूल देगलूर या शाळेत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नव नवीन उपक्रम साजरा करण्यात येत आहेत. त्यामध्ये शाळेच्या सर्व संचालक मंडाळाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी परिषद निवडणूक-2023 पार पाडण्यात आली. विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जागरूक करणे व समाजप्रबोधन करण्याचे काम हे शालेय जिवनातून घडविण्यासाठी विद्याथ्र्यांच्या विविध पदासाठी प्रत्यक्ष मतदानाद्वारे निवडणूक घेण्यात आली व त्यात स्कूल हेड बॉय, स्कूल हेड गर्ल, डेप्युटी हेड बॉय, डेप्युटी हेड गर्ल, स्पोर्ट कॅप्टन बॉय, स्पोर्ट कॅप्टन गर्ल असे अनेक पदे असून त्यांना मतदानाची प्रक्रिया माहिती करून देऊन त्यांचे फॉर्म भरणे, प्रचार करणे, मतदान करण्यासाठी त्यांची नियमावली याची संपूर्ण माहिती देऊन, प्रचार करण्यासाठी मुलांना एका दिवसातील शेवटच्या तासीकामध्ये वेळ देण्यात आलेला होता. त्यासाठी विद्यार्थ्यांना निवडणूक चिन्ह वाटप करणे, बॅलेट पेपर तयार करणे, मतदारांच्या बोटाला शाई लावणे आणि बॅलेट पेपर वर चिन्हाच्या समोर शिक्का मारून, बॅलेट पेपर हे मतदान पेटीमध्ये टाकून बंद करण्यापर्यंतचे प्रशिक्षण देण्यात
आले.
यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शाळेचे प्राचार्य श्री सचिन कोल्हे सर व उपप्राचार्य महेश बरे सर यांनी काम पाहिले. स्टूडेंट्स कौन्सील इलेक्शन 2023-24 ही निवडणूक सांस्कृतीक विभाग प्रमुख सुभाष मरखेले सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पार पाडण्यात आली. या निवडणूकीसाठी शाळेतील वर्ग 3 री ते 10 वी पर्यंत च्या विद्याथ्र्यांना
मतदानाचा हक्क देण्यात आला.
दि. 03.08.2023 रोजी स्टूडंट्स कॉन्सील इलेक्शन 2023-24 मधील विद्यार्थ्यांनी अतीशय उत्स्फुर्तपणे
मतदानाचा हक्क बजावला. त्याच दिवशी दि. 03.08.2023 रोजी वेळ दुपारी 3.30 वा. मतमोजणीला सुरूवात झाली एकूण
पाच फेन्या ठेवण्यात आले. सायंकाळी 6.00 वाजता निवडणूकीचा निकाल खालील प्रमाणे जाहीर करण्यात आला- स्कूल हेड
चप्पलवार ऋषीकेश सुरेश ५७४ पैकी १६८. मत मिळाले स्कूल हेड गर्ल श्रुती तानाजी भोसले ५७१ पैकी १८५ मत मिळाले ,डेप्युटी हेड बॉय पाटील रोहीत विश्वानाथ ५४१ पैकी २२९ मत मिळाले डेप्युटी हेड गर्ल लोलपे वैष्णवी राम ५६८ पैकी २३४ मत मिळाले स्पोर्ट कॅप्टन बॉय मठपती प्रथमेश वैजनाथ ६२३ पैकी २४९ मत मिळाले स्पोर्ट कॅप्टन गर्ल राजूरकर पणिका हेमंत ५७० पैकी मत मिळाले ३६३ वरील सर्व विजयी उमेदवारांचे शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. या सर्व प्रक्रियेसाठी शाळेतील शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेही मोलाचे योगदान व मार्गदर्शन लाभले आहे.