9 ऑगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण चौकात अंबाजोगाईकरांचा रास्ता रोको…
दैनिक चालु वार्ता
बीड प्रतिनिधी बालाजी देशमुख…
बीड/अंबाजोगाई -:अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी शहरातील नगरपरिषद सभागृहात आज दिनांक 6 ऑगस्ट रोजी बैठक पार पडली. या बैठकीला राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटना, वकील संघ, पत्रकार संघ, मेडिकल असोसिएशन यासह मोठ्या संख्येने अंबाजोगाईकर उपस्थित होते.अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्यासाठी असणारी सर्व पुरक कार्यालये येथे अस्तित्वात आहेत तरीही राजकीय इच्छाशक्ती अभावी अंबाजोगाई जिल्ह्याचा जिव्हाळ्याची मागणी गेली 35 वर्षापासून मागणीच राहिली.
अंबाजोगाई जिल्हा मागणीसाठी अंबाजोगाईकर सरसावले असून अभी नहीं तो कभी नहीं ही भूमिका अंबाजोगाईकरांनी घेतली आहे.या बैठकीत अंबाजोगाई जिल्हा कृती समिती सदस्यांची घोषणा केली याशिवाय 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी यशवंतराव चव्हाण चौक येथे भव्य रास्तारोको करुन जिल्ह्याच्या क्रांतीची मशाल अंबाजोगाईकर पेटवणार आहेत.
या बैठकीस मा.आ. पृथ्वीराज साठे, राजकिशोर मोदी,अनिकेत लोहिया बबनराव लोमटे, असिफोद्दीन खतीब, डॉ नरेंद्र काळे, ऍड अशोक कवडे,सुदर्शन रापतवार,सुनील जगताप,रमीज शेख,राणा चव्हाण,सारंग पुजारी, अभिजीत लोमटे,डॉ राहुल धाकडे, व्यंकटेश चामनर,अमित जाजू, राजेश वाहुळे, अमोल लोमटे,सुनील अडसूळ,सतीश मोरे, ऍड शिवाजी कांबळे, महादेव गोरे, मनोज लखेरा, संजय गंभीरे,गणेश मसने, संदीप शिनगारे,श्रीनिवास दरेकर, महादेव आदमने,बालाजी कांगणे,अशोक हॆडे, संतोष मोहिते,बालासाहेब शेप, राजपाल सारडा, स्वप्निल परदेशी, कल्याण काळे, अर पटेल,वीरेंद्र गुप्ता,जोगोजी साबणे,दादासाहेब कसबे, कृष्णा सुनील (काका) लोमटे, निर्मळ सर,श्याम सरवदे, अमन लोहिया, आनंद कर्णवट,अक्षय भुमकर, अशोक काळे, गायकवाड केवी, रणजीत मोरे, अश्रफ बागवान,उषा यादव,गणेश राऊत, सुभाष रोडे, अतुल कसबे,किरण भालेकर, तनिष श्रोत्री,प्रताप देवकर,अभिजित लोमटे आदीची उपस्थिती होती.