दै.चालु वार्ता
बीड प्रतिनिधी बीड अंबाजोगाई
‘मिरवणुकीत बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतम ताई मुंडे यांनी घेतले दर्शन’
अंबाजोगाई येथे राष्ट्रीय संत ऐश्वर्य संपन्न श्री भगवान बाबा जयंती ने संपुर्ण अंबाजोगाई गजबजून गेली होती.
राष्ट्रीय संत श्री भगवान बाबा जयंती निमित्त गेली सात दिवस कार्यक्रम चालूच होते या कार्यक्रमात मॅरेथॉन स्पर्धा प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे बक्षीस होती , ही मॅरेथॉन स्पर्धा तब्बल दहा किलोमीटरची होती. मॅरेथॉन स्पर्धेत ज्ञानदीप अकॅडमी चे दराडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही विद्यार्थी प्रथम, द्वितीय व तृतीय आले. त्याच दिवशी स्वर रत्न सुप्रसिद्ध गायक श्री सुभाष भाऊ शेप यांचे भगवान बाबा यांच्या जीवन चरित्रावरील संपूर्ण गायन व भक्ती गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
रक्तदान शिबिर आयोजित केले होते जवळपास 27 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
अंबाजोगाईत संत श्री भगवान बाबा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हे पूर्ण रोषणाईने व झेंड्यांनी गजबजुन गेले होते मुख्य आरक्षण भगवान बाबांची वीस फुटापेक्षा जास्त मोठे बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी ही होर्डिंग आकर्षक होती होर्डिंग चे सेल्फी फोटो अंबा नगरीतून येणाऱ्या जाणारे प्रवासी व इतर गाड्या थांबवून घेत होते.
भगवान बाबा चौका अतिशय सुंदर रोषणाईने चमचमीत केला होता.
संत श्री भगवान बाबा जयंती उत्सव अध्यक्ष श्री प्रशांत भैय्या शेप, शशिकांत शेप, मेघराज चाटे, गणेश शेप, दत्ता फड, सचिन कांदे,गोविंद शेप व इतर शेकडो भगवान भक्त स्वयंसेवक हे कार्यक्रम मिरवणूक यशस्वी करण्यासाठी रात्रं दिवस एक करत होते .मिरवणुकीच्या दिवशी औदुंबर ढोल पथक मुंबई येथील ढोल पथकाने हिंदू परंपरेतील ढोल वाद्य हे प्रमुख आकर्षण होते, तसेच अंबाजोगाई परळी पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले अवचारे बँड पथक मिरवणुकीत होते.
औदुंबर ढोल वाद्य व अवचारे बँड पथक यांची जुगलबंदी अंबाजोगाईकरांना पाहायला मिळाली.
*मिरवणुकीच्या पारंपारिक पद्धतीत सर्व वारकरी, बाल वारकरी ,घोडे हे भगवान बाबाच्या मूर्ती समोर मानाचे होते.*
संत श्री भगवान बाबा यांची उत्सव मूर्ती मिरवणूक भगवान बाबा चौकापासून दुपारच्या दरम्यान ढोल ताशे पथकांच्या गजरात निघाली संत श्री भगवान बाबा चौक ते शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक यादरम्यान येणारे सर्व महापुरुष, महात्म्यांचे चौक या चौकांना भगवानबाबा जयंती उत्सव समितीच्या मार्फत वंदन करून हार पुष्प घालण्यात आले, बस स्थानक येथे भगवान बाबांचा प्रतिमेला पुष्पहार घालून व शिवछत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार घालून वंदन करण्यात आले.
मिरवणूक संत श्री भगवान बाबा चौक येथून निघून शिवछत्रपती चौक मार्ग नागझरी परिसरातील श्री संत भगवान बाबा मंदिरापर्यंत ढोल ताशाच्या गजरात तिथे महाप्रसादाचे सत्यजित भाऊ शिरसाठ यांनी नियोजन करण्यात आले होते. मिरवणुकी दरम्यान पोलीस बंदोबस्त अतिशय चोख होता, मिरवणुकीतील अंबाजोगाईतील मान्यवर मंडळी ने दर्शन घेतले. बीड जिल्ह्याचा खासदार प्रीतम ताई मुंडे यांनी प्रतिमेला पुष्पहार म्हणून वंदन करून भगवान बाबा की जय गजर करण्यात आला.
मिरवणुकीत अंबाजोगाई व अंबाजोगाईच्या खेड्यापाड्यातील हजारो युवक भक्तगण उपस्थित होते.
मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी दि. ०६ तारखेला नागझरी परिसरातील संत श्री भगवान बाबा मंदिर येथे बाल योगी हरिहर महाराज यांच्या कीर्तन आयोजित करण्यात आले होते.
महाप्रसादाचा नियोजन वानटाकळी चे सरपंच श्री राजेभाऊ हंगे यांनी केली होते.