दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे…
पुणे (इंदापूर):रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी च्या पायथ्याशी असलेल्या नाणेवली येथील गोरगरीब कुटुंबीयांना इंदापूर तालुक्यातील विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांच्या माध्यमातून मदत करण्यात आली. ही मदत घेऊन तालुक्यातून माधुरी लडकत, निलोफर पठाण, निर्मला जाधव आणि अनिता खरात या महिला प्रत्यक्ष तेथे घेऊन गेले असता असे निदर्शनास आले की इरशाळवाडी येथील कुटुंबीयांना शासनाने निवास केंद्र उभारून त्यांना खरोखरच खूप चांगल्या पद्धतीने त्यांना सहकार्य केले आहे आणि लवकरच त्यांचे पुनर्वसन देखील होईल. सर्व महिलांच्या वतीने शासनाचे आभार मानण्यात आले. साड्या ,चोळी, परकर ,गृहपयोगी वस्तू ,लहान मुला मुलींचे कपडे, खाऊ वाटप करण्यात आला. यासाठी माधुरी लडकत, निलोफर पठाण ,निर्मला जाधव, अनिता खरात ,रेश्मा शेख, सीमा कल्याणकर ,सायरा आतार ,बकुळा शेंडे, वृषाली निंबाळकर, गलांडवाडीच्या सोनाली मॅडम या सर्वांनी मदत केली.