दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे …
नांदेड (देगलूर): ज्ञान सरस्वती इंग्लिश माध्यमिक स्कूलची माजी विद्यार्थिनी कु . वैष्णवी विश्वनाथ मठपती हिने सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविला..
देगलूर येथील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या ज्ञान सरस्वती इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देगलूर चे विविध स्तरावर जसे वैद्यकीय क्षेत्र ,आयआयटी क्षेत्र, बँकिंग क्षेत्र, व परदेशातही जाऊन यशाचे शिखर गाठत आहेत,
देगलूर शहरातील तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्याचे कार्य मागील बारा वर्षापासून सतत चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून
नुकत्याच जाहीर झालेल्या नीट या परीक्षेत 700 पैकी 605 मार्क घेऊन विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी विश्वनाथ मठपती हिने सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविला आहे,
तिने मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव श्री माणिकराव जोशी सर महाविद्यालयाचे प्राचार्य राजाराम पागेकर प्राथमिक विभागाच्या प्राचार्य सौ वैदेही पागेकर यांनी पालकांसमवेत विद्यार्थिनीचा सत्कार करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या…