दै.चालु वार्ता
रायगड म्हसळा प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा – न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज म्हसळा विद्यालयात डॉ. बापूजी साळुंखे यांचा ३६ वा स्मृतिदिन कार्यक्रम उत्सवात पार पडला असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्कूल कमिटी चेअरमन श्री समीरजी बनकर होते ते मनोगतात म्हणाले ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने ज्ञानाचा दिवा व तालुक्यामध्ये शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहोचवण्याचं कार्य बापूजींनी केले … कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य प्रा.श्री मच्छिंद्र जाधव साहेबांनी प्रतिमा व पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला व मनोगतात म्हणाले बापूजींनी गरिबीवर मात करून कसे शिक्षण पूर्ण केले … शिवाय त्यांचे महत्त्व पटवून दिले तसेच स्वामी विवेकानंदाच्या वेशभूषेत कु.स्वराज उद्धरकर ,बापूजी वेशभूषेत-आर्यन कळस व संस्थामाता वेशभूषेत रुची गाणेकर आले होते त्यांनी वेशभूषा करून कार्यक्रमात नाविण्यता आणली त्याचबरोबर लावण्या साळुंखे,दिया ओसवाल, सलोनी जयस्वाल, स्वामी करंबे विद्यार्थी मनोगत गुप्ता , अथर्व गायकवाड,प्रतिक जाधव या विद्यार्थ्यांनी बापूजींच्या जीवनावर व शिक्षकांमधून श्री वसावे एस. ए. व प्रा.चव्हाण सरांनी मनोगत व्यक्त केले.तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गायकवाड सर आणि सूत्रसंचालन श्री मुंडे सर यांनी केले . श्री सहारे सर व गीतमंच यांनी स्वागतगीत सादर केले. यावेळी श्री पाटील ई.सी, प्रा.सौ देवगावकर मॅडम,सौ हाके मॅडम,जमदाडे मॅडम,मोरे सर, आदी सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित असून स्मृतीदिनानिमित्त शहरातून भव्य रॅली काढून घोषणा देण्यात आल्या व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिर्के मॅडम यांनी केले.