अमरावती विभागातून २२०० विद्यार्थ्यांचा स्पर्धेत सहभाग
सप्रव जुनघरे,भक्ती नैनानी,अवनी भोरे हे विद्यार्थी ठरले चॅम्पियन
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती : नुकतीच अमरावती येथे एवरेस्ट अबॅकस अकॅडमीचा २२ व्या नॅशनल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेदरम्यान अमरावती विभागातील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.तर स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चु कडू यांच्या हस्ते करण्यात आला.
अमरावती येथील रंगोली लॉन येथे दि.६ ऑगस्ट २०२३ रोजी पार पडलेल्या या नॅशनल लेव्हल स्पर्धेला अमरावती विभागातील २२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.तर अबॅकसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपले बुद्धी चातुर्य कौशल्य दाखवत ५ मिनिटामध्ये १५५ बेरजा,१३४ वजाबाकी,१५४ गुणाकार व ७४ वर्ग गणिते सोडविली.यामध्ये कुमार सप्रव श्रीकांत जुनघरे,भक्ती नैनानी,अवनी भोरे हे विद्यार्थी चॅम्पियन ठरले असून त्यांना आमदार बच्चु कडू यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी अमरावती पोलीस निरीक्षक आसाराम चोरमाले,सहाय्यक कार्यकारी अध्यक्ष समग्र शिक्षा,मनपा अमरावती श्री पंकजकुमार सपकाळ,संचालक अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँक रवींद्र विठ्ठलराव गायगोले,शिक्षणाधिकारी अमरावती डॉ.प्रकाश मेश्राम,विस्तार शिक्षण अधिकारी डीसीपी गायकवाड तसेच गोल्डन इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.नम्रता खंडारे व एवरेस्ट अबॅकस चे अध्यक्ष अशोकराव घडेकर,शिक्षिका कु.प्राजक्ता वऱ्हेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
काय आहे अबॅकस
अबॅकस हे मोजणीसाठी एक साधे उपकरण,ज्यामध्ये तारा किंवा खांब असलेली फ्रेम असते.ज्यात मणी सरकतात.त्याच्या साहाय्याने आपण मोजणी करू शकतो.आजकाल अनेक शाळांमध्ये अबॅकस मोठ्या प्रमाणत वापरले जाते आणि सोप्या पद्धतीने गणिते सोडवली जातात.त्यामूळे अबॅकस हे फार लोकप्रीय असून अबॅकस चा वापर करून बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार करिता करू शकतो.