गोविंद पवार / उपसंपादक नांदेड…
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संधी दिल्यास लोहा-कंधार विधानसभा निवडणुक लढविणार असल्याची माहिती शिवसेनेचे लोह-कंधार मधील नेते तथा धर्मवीर शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पाटील जाधव सुनेगावकर यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली.
पुढे बोलताना बाळासाहेब पाटील जाधव सुनेगावकर म्हणाले की,मी गेली १५ ते २० वर्षांपासून सामाजिक चळवळीत सक्रिय असुन शेतकरी,शेतमजूर, सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी अनेक आंदोलने केली शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले .
तसेच मी सुरुवातीपासून शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा पाईक असुन त्यांच्या ध्येयधोरणानुसार ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण आम्ही करतोत.
मी लोहा -कंधार मतदार संघात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काम इमानेइतबारे करीत आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेनेमुळे महाराष्ट्र सामान्य शिवसेनेचे कार्यकर्ते आमदार, खासदार, मंत्री झालेत .
त्यामुळे माझ्यासारख्या शेतकऱ्यांच्या मुलांना जर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी लोहा -कंधार विधानसभेची उमेदवारी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने द्यावी यासाठी मी इच्छुक उमेदवार आहे व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संधी दिल्यास लोहा-कंधार विधानसभा निवडणुक लढविणार असल्याची माहिती बाळासाहेब पाटील जाधव सुनेगावकर यांनी दिली.