दै.चालु वार्ता
बीड जिल्हा प्रतिनिधी बीड परळी
महाविद्यालयाच्या वतीने सत्कार…
माहेरी शेपवाडी येथे पण आनंदोत्सव..
परळी येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील प्राध्यापिका पृथ्वी देविदास शेप या नुकतीच राष्ट्रीय स्तरावरील रसायनशास्त्रातील युजीसी नेट परिक्षा पास झाल्या असून महाविद्यालयाच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील प्राध्यापीका पृथ्वी देविदास शेप यांनी यापूर्वी वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असलेली अत्यंत कठीण असलेली सेट परिक्षा उत्तीर्ण झाल्या असून आता नुकतीच रसायनशास्त्र विषयातून राष्ट्रीय स्तरावर असलेली पात्रता
परिक्षा युजीसी नेट या उत्तीर्ण झाल्या आहेत लग्न झाल्यानंतरही अत्यंत कठीण परिस्थिती मुलेबाळे संभाळून शिक्षणा संदर्भात जिन असल्याने युजीसी नेक परिक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. याबद्दल महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या वतीने बुधवार सत्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे यांच्या हस्ते शाल, पुष्प- गुच्छ देवून सत्कार करण्यात आला कार्यक्रमास रसायनशास्त्र विभागाच विभागप्रमुख प्रा. डॉ विलास देशपांडे, प्रा. डॉ विवेकानंद कवडे, प्रा शरद रोडे, प्रा विशा पौळसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर आनंदाची बातमी त्यांच्या माहेरी शेपवाडी येथे कळाल्या नंतर त्यांचे बंधू श्री नामदेव शेप यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. शेपवाडीतील युवा नेते श्री राजेभाऊ शेप व इतर मान्यवरांनी पुढील वाटचालीस प्राध्यापीका ताईला शुभेच्छा दिल्या…