दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी मंठा/ सुरेश ज्ञा. दवणे
मंठा तालुक्यातील एरंडेश्वर-कोकरसा गट ग्रामपंचायत एरंडेश्वर येथील दलित वस्ती सुधार योजनेतील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असुन त्याची चौकशी करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत सिमेंट रस्त्याचे काम करताना निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरून सोलिंग न करता डायरेक्ट सिमेंट काँक्रीट वापरून निकृष्ट रस्ता बनवला आहे. असे बांधकाम करून रस्ता कसा टिकणार सवाल नागरिक करीत आहे.अशा प्रकारे दर्जाहीन काम करून शासनाची फसवणूक करीत आहेत तरी या रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करण्यात यावी या निवेदनावर मारुती वसंतराव देशमुख, विजय देविदास मस्के यांच्या सहया आहेत. सदरील कामाची चौकशी करण्यात येईल शाखा अभियंता -आदित्य बुलबुले..