दैनिक चालु वार्ता
रायगड म्हसळा प्रतिनिधी अंगद कांबळे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक श्री सुभान इक्बाल हळदे यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटा मधे जिला प्रमुख मा श्री अनीलजी नावगणे साहेब यांच्या उपस्थिती मा. श्री उद्धव जी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षा वर विश्वास ठेवून व त्यांची मुस्लिम समाज यांच्यावर जे त्यांचे प्रेम आहे त्याला लक्षात घेता आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्याच बरोबर म्हसळा शहराचे उच्च शिक्षित श्री नदीम भाई दफेदार व असंख्य मुस्लिम समाजाचे लोकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. या वेळी शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे रायगड जिला प्रमुख श्री अनिल जी नवगणे, दक्षिण रायगड प्रमुख श्री नंदू शेठ शिर्के, नगरसेविका श्रीम. राखी करंबे, नगरसेवक श्री. अनिकेत पानसारे , म्हसळा तालुका अल्पसंख्यक प्रमुख श्री शौकत भाई हजवाने, पदाधिकारी व असंख्यक कार्यकर्ते उपस्थित होते.